इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) तुफान फॉर्ममध्ये असलेला दिसून येतोय. त्याने आतापर्यंत खेळलेल्या सर्व सामन्यात शानदार फलंदाजी केलीय. त्याच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असतानाच, त्याचाच संघ सहकारी आणि भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने त्याचे कौतुक करताना मोठी गोष्ट म्हटली आहे.
काय म्हणाला विराट?
शनिवारी (दि. १६ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर सामन्यात दिनेश कार्तिकने फिनिशरची भूमिका पार पाडताना संघाला अडचणीतून बाहेर काढले होते. त्याने ३४ चेंडूत ६६ धावा बनवल्या होत्या. अखेरीस आरसीबी १६ धावांनी सामना जिंकण्यात यशस्वी झाली होती. त्या सामन्यानंतर विराट कोहली दिनेश कार्तिकचे कौतुक करताना थांबला नाही. विराटने आयपीएलच्या संकेतस्थळाशी बोलताना म्हणले, “दिनेश कार्तिकसारख्या शानदार खेळाडूला असे खेळताना पाहणे सन्मान आहे. तो माझ्यासाठी आत्तापर्यंत चा मॅन ऑफ द आयपीएल बनलाय. आम्ही अनेक वर्ष एबी डिव्हिलियर्सला आरसीबीसाठी मॅच फिनिश करताना पाहिलेय. त्यालाही डीकेच्या खेळावर अभिमान वाटत असेल.”
विराट पुढे बोलताना म्हणाला, “त्याचे लक्ष एकदम ठरलेले आहे. अशा प्रकारचा खेळ करून त्याने केवळ आरसीबी नव्हे, तर आणखी उच्चस्तरावर खेळण्यासाठी आपली दावेदारी ठोकलीय. लोक त्याला नोटीस करत आहेत. तो पुन्हा एकदा भारतीय संघात खेळण्यासाठी तयार दिसतोय.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
दिनेश कार्तिक या हंगामात तुफान फॉर्ममध्ये खेळताना दिसतोय. मेगा लिलावात आरसीबीने त्याच्यावर पाच कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले होते. त्याने आतापर्यंत सहा सामने खेळताना २०९ च्या स्ट्राईक रेटने १९७ धावा बनविल्या आहेत. विशेष म्हणजे या दरम्यान तो केवळ एकदाच बाद झाला. त्याने एकट्याच्या बळावर संघाला आतापर्यंत तीन सामने जिंकून दिलेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! कोरोना पॉझिटिव्ह मिशेल मार्शचा आरटी- पीसीआर रिपोर्ट आला
तोडफोड गोलंदाजी! लॉकी फर्ग्युसनने टाकला खतरनाक यॉर्कर, तुटली अंबाती रायुडूची बॅट





