रविवारी (दि. 14 मे) आयपीएल 2023 स्पर्धेतील 60वा सामना राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळला गेला. या सामन्यात बेंगलोर संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली. विशेष म्हणजे, या विक्रमात त्याने मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा याची बरोबरी केली आहे. चला तर दिनेश कार्तिकच्या नकोशा विक्रमाबद्दल जाणून घेऊयात.
दिनेश कार्तिकचा नकोसा विक्रम
या सामन्यात बेंगलोर संघाकडून फलंदाजी करताना चौथ्या क्रमांकावरील फलंदाज महिपाल लोमरोर बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) पाचव्या स्थानी उतरला होता. यावेळी राजस्थानकडून 16वे षटक ऍडम झम्पा टाकत होता. झम्पाने पहिल्या चेंडूवर लोमरोरची विकेट काढल्यानंतर दिनेश कार्तिकला तिसऱ्या चेंडूवर पायचीत बाद केले. यावेळी कार्तिक फक्त 2 चेंडू खेळून शून्यावर तंबूत परतला. यावेळी बाद होताच कार्तिकने आपल्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला.
आयपीएल इतिहासात दिनेश कार्तिक (Dinesh Karthik 16 Ducks in IPL) हा सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू बनला. त्याने याबाबतीत रोहित शर्मा (Rohit Sharma) याची बरोबरी केली. कार्तिक आतापर्यंत 16 वेळा शून्यावर बाद झाला आहे. रोहितच्या नावावरही इतकाच आकडा आहे. त्याच्यानंतर संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी सुनील नारायण आणि मनदीप सिंग असून ते प्रत्येकी 15 वेळा शून्यावर बाद झाले आहेत. याव्यतिरिक्त तिसऱ्या स्थानी संयुक्तरीत्या अंबाती रायुडू, ग्लेन मॅक्सवेल आणि मनीष पांडे हे खेळाडू आहेत. ते आयपीएलमध्ये प्रत्येकी 14 वेळा शून्यावर बाद झाले आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा शून्यावर बाद होणारे खेळाडू
16 – दिनेश कार्तिक*
16 – रोहित शर्मा
15 – सुनील नारायण
15 – मनदीप सिंग
14 – अंबाती रायुडू
14 – ग्लेन मॅक्सवेल
14 – मनीष पांडे
बेंगलोरचा डाव
बेंगलोरने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 171 धावा चोपल्या. यामध्ये दोन खेळाडूंच्या अर्धशतकाचा समावेश होता. त्यात कर्णधार फाफ डू प्लेसिस (55) आणि ग्लेन मॅक्सवेल (54) हे खेळाडू आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त अनुज रावत यानेही 11 चेंडूत 29 धावांची वादळी खेळी साकारली.
यावेळी राजस्थानकडून गोलंदाजी करताना दोन खेळाडूंनी प्रत्येकी 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्या खेळाडूंमध्ये ऍडम झम्पा आणि केएस आसिफ यांचा समावेश आहे. त्यांच्याव्यतिरिक्त संदीप शर्मा यानेही एक विकेट आपल्या नावावर केली. (Dinesh Karthik bad record most duck in ipl know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या–
बेंगलोरसाठी फाफ बनला ‘रनमशीन’, 24 धावांचा टप्पा पार करताच नावावर केला IPL 2023मधील खास विक्रम
काँग्रेसने कर्नाटक विधानसभा जिंकताच विराटची राहुल गांधींसाठी खास पोस्ट? सर्वत्र रंगली एकच चर्चा