रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने मुंबई इंडियन्सविरुद्धचा आयपीएल 2023चा 54वा सामना 6 विकेट्सने गमावला. या सामन्यात आरसीबीचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक बाद झाल्यानंतर तंबूत परतत होता. मात्र, फलंदाजीदरम्यान त्याची तब्येत खालावल्याचे दिसले. आता त्याला नेमकं काय झालं होतं, याविषयी संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी मोठा खुलासा केला आहे. चला तर जाणून घेऊयात बांगर नक्की काय म्हणाले…
संजय बांगर (Sanjay Bangar) यांच्यानुसार, दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आजारी पडला होता. जेव्हा तो ड्रेसिंग रूममध्ये जात होता, तेव्हा दिनेश कार्तिकला उलटी होऊ लागली होती.
‘दिनेश कार्तिकला बरे वाटत नव्हते’
सामन्यानंतर संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी सांगितले की, दिनेश कार्तिकसोबत काय झाले होते. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “आपल्या फलंदाजीवेळी दिनेश कार्तिकला बरे वाटत नव्हते. असे वाटत होते की, त्याच्या शरीरातील पाणी कमी झाले आहे. आता आम्हाला 3-4 दिवसांनंतर सामना खेळायचा आहे, तेव्हा कदाचित औषध घेतल्यानंतर कार्तिक पुढील सामन्यासाठी फिट होईल. तो आमच्या संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे. तसेच, तो एक महत्त्वाची भूमिका बजावतो.”
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1655977221977407489
दिनेश कार्तिक याने सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सविरुद्ध वादळी फलंदाजी केली. त्याने या सामन्यात 18 चेंडूत 30 धावांची तडाखेबंद खेळी साकारली. मात्र, तो जेव्हा बाद होऊन तंबूत चालला होता, तेव्हा त्याला उलटी आली. त्याला पाहून स्पष्टपणे समजत होते की, त्याला बरे वाटत नाहीये. तसेच, तो दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण करण्यासाठीही आला नव्हता. त्याच्या जागी अनुज रावत याने यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली.
https://twitter.com/iVikramRajput/status/1655977724886888451
या सामन्यात आरसीबी संघाने निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 199 धावा केल्या होत्या. हे आव्हान मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादव याच्या 83 धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर 16.3 षटकात पार केले आणि मोठा विजय मिळवला. या पराभवामुळे आता आरसीबीचा प्ले-ऑफमध्ये जाण्याचा मार्ग खडतर झाला आहे. (ipl 2023 dinesh karthik started feeling unwell was a bit dehydrated says batting coach sanjay bangar)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट ते धोनी, ‘हे’ खेळाडू महिला असते, तर कसे दिसले असते? नावासहित पाहा त्यांचे AI फोटो
वढेराच्या षटकारामुळे टाटा टियागोचे नुकसान, तरीही टाटाच देणार 5 लाख रुपये, ‘हे’ आहे कारण






