इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत बुधवारी (२१ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगलेला पाहायला मिळाला आहे. बुधवारी दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघात झाला. हा सामना कोलकाता संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकसाठी खास ठरला आहे. तो या सामन्यासाठी मैदानात उतराच त्याच्या नावावर खास विक्रमाची नोद झाली.
कार्तिकच्या आयपीएल कारकिर्दीतील हा २०० वा सामना आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये २०० सामने खेळणारा तो केवळ तिसराच खेळाडू ठरला आहे. त्याच्यापूर्वी असा विक्रम केवळ चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला जमला आहे.
एमएस धोनीने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक २०८ सामने खेळले आहेत. तर रोहितने आयपीएलमध्ये २०४ सामने खेळले आहेत. आत्तापर्यंत आयपीएलमध्ये २०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने एमएस धोनी, रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकलाचा करता आला आहे.
कार्तिकने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये कोलकाता शिवाय रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच त्याने आत्तापर्यंत २०० सामन्यांतील १८० डावात ३८५५ धावा केल्या आहेत.
आयपीएल इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू
२०८ सामने – एमएस धोनी
२०४ सामने – रोहित शर्मा
२०० सामने – दिनेश कार्तिक
१९७ सामने – सुरेश रैना
१९५ सामने – विराट कोहली
असे होते ११ जणांचे संघ –
चेन्नई सुपर किंग्स – ऋतूराज गायकवाड, फाफ डू प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), सॅम करन, शार्दुल ठाकूर, लुंगी एन्गिडी, दीपक चाहर.
कोलकाता नाईट रायडर्स – नितीश राणा, शुबमन गिल, राहुल त्रिपाठी, ओएन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सुनील नारायण, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, वरुण चक्रवर्ती, प्रसिद्ध कृष्णा.
महत्त्वाच्या बातम्या –
एकाच मोसमात तिन प्रकारे शुन्यावर बाद होणारा दुसरा फलंदाज बनला पूरन, ‘हा’ दिग्गज ठरलेला पहिला मानकरी
फिंचला हटवून हा खेळाडू टी२० क्रमवारीत दुसऱ्या स्थानी, तर विराट ‘या’ क्रमांकावर
दिल्लीविरुद्ध पोलार्डने केले होते नेतृत्व, तरीही दंड मात्र रोहित शर्माला; कारण घ्या जाणून