हार्दिक पंड्या हा त्याच्या अष्टपैलू प्रदर्शनासाठी ओळखला जातो. भारताचा कट्टर प्रतिद्वंद्वी असलेल्या पाकिस्तान संघाविरुद्धही त्याने आपल्या अष्टपैलू प्रदर्शनाचा नमुना सादर केला. प्रथम धारदार गोलंदाजी करत त्याने पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्यानंतर फलंदाजीतही त्याने वादळी खेळी करत संघाला 5 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवून दिला. त्याच्या या मॅच विनिंग प्रदर्शनाचे कौतुक त्याला सामनावीर पुरस्कार देऊन करण्यात आले.
याबरोबरच भारताचा अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) हादेखील हार्दिकचे (Hardik Pandya) कौतुक करण्यापासून स्वत:ला थांबवू शकला (Dinesh Karthik Bows Hardik Pandya) नाही. कार्तिकने तर भर मैदानातच हार्दिकच्या प्रदर्शनाला सलाम ठोकला. हा प्रसंग कॅमेरात कैद झाला असून याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
त्याचे झाले असे की, प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा (India vs Pakistan) संघ 19.5 षटकातच 147 धावांवर गुंडाळला गेला. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या 148 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची वरची फळी विशेष प्रदर्शन करू शकली नाही. 89 धावांवर भारताचे आघाडीचे 4 फलंदाज माघारी परतले. मात्र रविंद्र जडेजा आणि हार्दिक या अष्टपैलूंनी भारतीयांच्या आशा जिवंत ठेवल्या.
जडेजा 29 चेंडूत 35 धावा करून 20व्या षटकातील पहिल्या चेंडूवर बाद झाला. अशात हार्दिकने मॅच फिनिशरची भूमिका बजावली. हार्दिकने शेवटच्या 4 चेंडूत संघाला विजयासाठी 6 धावांची गरज असताना धडाकेबाज शेवट केला. त्याने मोहम्मद नवाजच्या 20व्या षटकातील चौथ्या चेंडूवर खणखणीत षटकार मारत सामना जिंकून दिला. हार्दिकने ऑफ स्टंप्सच्या बाहेरून आलेल्या चेंडूवर पुल शॉट मारला आणि चेंडू षटकारासाठी पाठवला.
Dinesh Karthik bowed down to Hardik Pandya after he finished the game. pic.twitter.com/z9VhblklKI
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 28, 2022
Dinesh Karthik is literally whole India to Hardik today pic.twitter.com/Ei1EFCWchb
— Dope (@dope_jatt) August 28, 2022
https://twitter.com/tariqueSH/status/1563957010181238784?s=20&t=cSfhp5eQxyKgUlTgPyLxlQ
हार्दिकने एमएस धोनीच्या स्टाईलमध्ये भारतीय संघाला सामना जिंकून दिला. हार्दिकला अशाप्रकारे सामन्याचा शेवट करताना पाहून नॉन स्ट्राईकरवर असलेला कार्तिकही त्याच्या प्रेमात पडला. त्याने हार्दिकला खाली वाकून सलाम केला. तसेच टाळ्या वाजवत त्याचे कौतुकही केले. सोशल मीडियावर या प्रसंगाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
दमदार प्रदर्शन करूनही भुवनेश्वर ऐवजी हार्दिकला का मिळाला सामनावीर पुरस्कार? जाणून घ्या
टीम इंडियाच्या धमाकेदार विजयानंतर शरद पवारांचेही सेलिब्रेशन! पाहा व्हिडिओ
सोबत खेळता-खेळता विराटने केली रोहितची बरोबरी; ‘या’ विक्रमासाठी दोघात रंगणार पाठशिवणीचा खेळ