ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकात भारताला अपयशाचा सामना करावा लागला. त्यानंतर बीसीसीआयकडून चेतन शर्मा अध्यक्ष असलेल्या पूर्ण निवड समितीला बरखास्त करण्यात आले. विश्वतषकाच्या उपांत्य फेरीत भारताला इंग्लंडच्या हातून 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर भारतीय संघाचा भाग असलेल्या दिनेश कार्तिक याने निवड समितीच्या बरखास्तीवर उघडपणे प्रतिक्रिया दिली.
विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर बीसीसीआयने एक मोठे पाऊल उचलले आहे. चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या निवड समितीचा हा चौथा विश्वचषक आहे, ज्यात भारताची झोळी मोकळीच राहीली. बाकीच्या तीन स्पर्धेत विश्व टेस्ट चॅम्पियन्स फायनल्स, टी20 विश्वचषक 2021 आणि आशिया चषक 2022 सामील आहेत. यापैकी फक्त एका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत प्रवेश करु शकला. यावर अजून कोणतीही अधिकारीक घोषणा किंवा रॉजर बिन्नी (Roger Binny) यांचे वक्तव्य समोर आलेले नाही. मात्र, निवड समितीसाठी नवे अर्ज मागवण्यात आलेे आहे.
एका माध्यम संस्थेशी चर्चा करताना दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने यावर वक्तव्य केले . यात त्याने निवड समिती बरखास्त करण्यावर आश्चर्य व्यक्त केले. त्याचबरोबर नव्या निवड समितीला आगामी काळात खूप संधी आहेत. कार्तिक म्हणाला की, “निवड समिती बरखास्त होणे ही नक्कीच आश्चर्याची गोष्ट आहे. आता नवीन सदस्यांना निवड समितीत येण्याची संधी आहे आणि हे कशाप्रमाणे काम करेल हे बघण्यासारखे राहील.”
कार्तिकच्या मते निवड समितीच्या बरखास्त होण्याचे वर्णन ‘सॅक’ या शब्दात केले नाही पाहिजे. त्याचे म्हणणे आहे की निवड समितीचा कार्यकाळ तसाही संपणार होता आणि अशा पद्धतीने बदल होणारच होते. यावेळी तो निवड समितीची पाठराखण करत म्हणाला की 15 खेळाडू निवडण्याचे काम अवघड असते आणि नव्या निवड समितीने काही कठीण निर्णय घेणे गरजेचे आहेत.(Dinesh Karthik commented on new selectors committee)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुढच्या वर्षी आयपीएल खेळणार जो रुट! टी-20 फॉरमॅटमध्ये पुनरागमन करण्याची व्यक्त केली इच्छा
FIFA WORLD CUP: मेस्सीच्या अर्जेंटिनाला पराभवाचा धक्का! दुबळ्या सौदी अरेबियाने चारली धूळ