Wednesday, February 1, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुढच्या वर्षी आयपीएल खेळणार जो रुट! टी-20 फॉरमॅटमध्ये पुनरागमन करण्याची व्यक्त केली इच्छा

पुढच्या वर्षी आयपीएल खेळणार जो रुट! टी-20 फॉरमॅटमध्ये पुनरागमन करण्याची व्यक्त केली इच्छा

November 22, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/englandcricket

Photo Courtesy: Twitter/englandcricket


इंग्लंड संघाचा माजी कसोटी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज जो रुट आयीपएल 2023 मध्ये खेळणार असल्याचे संकेत सध्या मिळत आहेत. मागच्या पाच वर्षांमध्ये इंग्लंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सांभाळत असल्यामुळे रूट आणि टी-20 क्रिकेटचे नाते काहीसे दुरावले गेले, असे दिसते. पण कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर आता तो आयपीएलमध्ये खेळू इच्छितो असे त्याने स्वतःच सांगितले आहे. माध्यमांशी बोलताना रुटने याविषयी माहिती दिली. 

जो रुट () यापूर्वी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा टी-20 ब्लास्ट आणि द हंड्रेड लीगच्या 2018-19 हंगामात केळला आहे. सिडनी थडर्स संघाकडून त्याला या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली होती. रुटने यापूर्वी आयपीएलमध्ये खेळण्यासाठी लिलावात स्वतःचे नाव देखील दिले होते, पण त्याला एकाही संघाने खरेदी केले नाही. आता पुढच्या आयपीएल हंगामापूर्वी रुटने पुन्हा एकदा या लीगमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

जो रुट आयपीएलमध्ये अद्याप एकही सामना खेळला नाहीये. तसेच ऑस्ट्रेलियासाठीही मागच्या काही वर्षात त्याला टी-20 सामना खेळला गेला नाहीये. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात रुटने 42 चेंडूत 47 धावा केल्या होत्या. डेलिमेलने दिलेल्या माहितीनुसार रुट म्हणाला की, “मी नक्कीच आयपीएलच्या लिलावात सहभागी होऊ इच्छित आहे. मला आशा आहे त्याठिकाणी मला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. आयपीएलमध्ये ज्या पद्धतीचे सामने होतात, ते पाहून असे वाटते की, तिथे खेळणे फायदेशीर असेल. मला नेहमीच टी-20 प्रकारात विश्रांती दिली गेली आहे. पण आता मी या प्रकारात मागे पडलो आहे, असे वाटते. पुढचे वर्ष या प्रकारात खेळण्यासाठी योग्य असेल.”

दरम्यान, रुटने यावर्षीच्या सुरुवातीलाही आयपीएलमध्ये खेळण्याविषयी महत्वाची प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी रुट म्ङणाला होता की, तो आयपीएल खेळू इच्छितो, पण त्यामुळे त्याच्या कसोटी प्रदर्शनावर कुठलाही परिणाम होणार नाही, याचीही तो काळजी घेईल. अशात आयपीएलच्या आगामी हंगामात खेळण्याविषयी रुट येत्या काही दिवसांमध्ये शेवटचा निर्णय घेऊ शकतो, असेच दिसते. (Joe Root expressed his desire to play in IPL 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आता पंतला हाकलण्याची वेळ आलीये’, रिषभच्या फ्लॉप प्रदर्शनानंतर चाहत्यांच्या तिखट प्रतिक्रिया
सिराजने केली न्यूझीलंडची हवा टाईट, ‘या’ विस्फोटक फलंदाजालाही बनवले शिकार 


Next Post
Shocking

इंग्लंडचा मोठा खेळाडू डोपिंग टेस्टमध्ये अडकला, ऑस्ट्रेलियन फ्रॅंचायझीनेही तोडले सगळे संबंध

Umran Malik and sanju samson

सॅमसन आणि उमरानला संधी‌ न देण्यावर हार्दिक म्हणतोय, "हा माझा संघ आहे"

Dinesh Kartik on selectors

जुन्या निवड समिती बद्दल कार्तिकचे वक्तव्य; म्हणतोय,'त्यांनी खूप..'

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143