क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. बलाढ्य इंग्लंड संघाच्या एका खेळाडूवर करारातून मुक्त होण्याची नामुष्की ओढवली आहे. इंग्लंडचा क्रिकेटपटू लॉरी इव्हान्स याच्या डोपिंग टेस्टमध्ये प्रतिबंधित पदार्थाची पुष्टी झाली. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमधील पर्थ स्कॉर्चर्स संघाने कारवाईचा बडगा उगारत त्याच्याशी असलेले करार तोडून टाकले. या बातमीमुळे क्रिकेट विश्वातून एकच खळबळ माजली आहे.
लॉरी इव्हान्स (Laurie Evans) याने सोमवारी (दि. 21 नोव्हेंबर) ‘व्यावसायिक क्रिकेटर्स असोसिएशन’मार्फत एका निवेदन जारी केले. त्यात त्याने म्हटले की, तो ऑगस्टमध्ये झालेल्या तपासाच्या निकालांमुळे हैराण आहे. तो त्यावेळी इंग्लंडमध्ये ‘द हंड्रेड’ (The Hundred) स्पर्धेत मॅनचेस्टर ओरिजिनल्सकडून खेळत होता. इव्हान्सने यावेळी हे सांगितले नाही की, त्याचे नमुने कोणत्या पदार्थाचे असल्याची पुष्टी झाली आहे. त्याने प्रतिबंधित पदार्थाचे सेवन केल्याचे नाकारले आहे.
काय म्हणाला लॉरी इव्हान्स?
लॉरी इव्हान्स याने म्हटले की, “मी स्वच्छ खेळात विश्वास ठेवतो. तसेच, मी कधीही प्रतिबंधित पदार्थांचे सेवन केले नाहीये. मला माहिती नाहीये की, तपासात प्रतिबंधित पदार्थांची पुष्टी कशाप्रकारे झाली. मी आणि माझा संघ याविषयी तपास करत आहोत की, हे कसे काय होऊ शकते. मी याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे.”
दुसरीकडे, पर्थ स्कॉर्चर्स (Perth Scorchers) संघाने म्हटले की, याविषयी समजताच ते नाराज झाले आहेत. या परिस्थितीतमध्ये फ्रँचायझी आणि इव्हान्स तसेच त्यांच्या संघ व्यवस्थापनाने आगामी स्पर्धेसाठीचा करार समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लिश काऊंटी क्रिकेटमध्ये सरे संघासाठी खेळणारा इव्हान्स कधीही राष्ट्रीय संघाकडून खेळला नाही.
Club Statement: The Perth Scorchers are disappointed to learn of Laurie Evans’ positive anti-doping test result relating to a sample provided in August 2022. Read more 👉 https://t.co/MnramVJliE pic.twitter.com/Gweas1VSxO
— Perth Scorchers (@ScorchersBBL) November 22, 2022
इव्हान्स याने पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि वेस्ट इंडिजमध्ये फ्रँचायझी क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. (england cricketer laurie evans failed in anti doping test know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आता पंतला हाकलण्याची वेळ आलीये’, रिषभच्या फ्लॉप प्रदर्शनानंतर चाहत्यांच्या तिखट प्रतिक्रिया
व्हिडिओ: इंग्लंडविरुद्ध दीडशतक झळकावणाऱ्या पठ्ठ्याने कच्चून मारला षटकार, वॉर्नरही पाहतच राहिला