इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत गुरुवारी (२९ एप्रिल ) रंगलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमने सामने होते. या सामन्यात दिल्ली संघाने ७ गडी राखून एकहाती विजय मिळवला होता. या सामन्यात पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी तुफान फटकेबाजी केली होती. तसेच दिल्ली संघाची फलंदाजी सुरू असताना धवन आणि दिनेश कार्तिक यांच्यामध्ये मजेशीर युद्ध देखील पाहायला मिळाले होते, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या सामन्यात बारावे षटक चालू असताना धवन आणि कार्तिक यांच्यामध्ये मजेशीर युद्ध पाहायला मिळाले होते. धवन स्ट्राइकवर असताना गोलंदाजाने लेग साइडच्या दिशेने टाकलेल्या चेंडूवर त्याने फाइन लेगच्या दिशेने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो चेंडू सरळ यष्टिरक्षक कार्तिकच्या हातात गेला होता. त्यानंतर कार्तिकने धवनचा पाय क्रिजच्या आत असतानाही त्याला यष्टीचीत करत त्याच्या दांड्या गुल केल्या होत्या. त्यावेळी धवन आणि कार्तिक यांच्यात मजेशीर युद्ध पाहायला मिळाले होते.
अंपायरकडे अपील केल्यानंतर कार्तिकने धवनच्या पायाकडे इशारा करत काहीतरी म्हटले होते, कदाचित तो म्हणाला असेल की, ‘तू बाद झाला आहेस’. त्यानंतर धवन देखील रागाने ‘मी बाद नाही झालो’ असे म्हणत मैदानावर गुडघ्यांवर बसल्याचे पाहायला मिळाले होते. हे झाल्यानंतर दोघेही हसायला लागले आणि हाथ देखील मिळवला. तिसऱ्या अंपयारने देखील धवनला नॉट आऊट घोषित केले होते.
Never a dull moment when @SDhawan25 is on the field. ???? @DineshKarthik ????????????????https://t.co/GDR4bTRtlQ #DCvKKR #VIVOIPL pic.twitter.com/lwohB8NNou
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2021
या सामन्यात कोलकाता संघाने प्रथम फलंदाजी करताना १५५ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने तुफान फटकेबाजी केली. पृथ्वी शॉने पहिल्याच षटकात ६ चेंडूवर ६ चौकार मारले होते. तसेच त्याने अवघ्या ४१ चेंडूत ८२ धावांची खेळी केली होती. यात त्याने ११ चौकार आणि ३ षटकार लगावले होते. तसेच शिखर धवनने देखील ४७ चेंडूत ४६ धावांची खेळी केली होती. यात त्याने ४ चौकार आणि १ षटकार लगावला होता. तसेच या स्पर्धेत सर्वाधिक ३११ धावा करत शिखर धवनने पुन्हा एकदा ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्याच षटकात ६ चौकार मारणाऱ्या पृथ्वी शॉचे सामन्यानंतर शिवम मावीने धरले मानगूट, पाहा व्हिडिओ





