भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvsSA) यांच्यात शुक्रवारी (१७ जून) चौथा टी२० सामना झाला. हा सामना भारताला जिंकणे आवश्यक असताना भारतीय खेळांडूनी चांगली कामगिरी करत सामना मोठ्या धावांच्या फरकाने जिंकला आहे. राजकोट येथे झालेल्या या सामन्यात भारताने ८२ धावांनी विजय मिळवत मालिका २-२ अशी बरोबरीत आणली आहे. या सामन्यात दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने धमाकेदार अर्धशतकी खेळी केली आहे.
कार्तिकने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये १६ वर्षाच्या कारकिर्दीनंतर अर्धशतक ठोकले आहे. त्याने २७ चेंडूत ५५ धावा केल्या आहेत. यावेळी त्याने ९ चौकार आणि २ षटकार फटकारले आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देखील मिळाला आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी ही मालिका उपयुक्त ठरणार आहे. या मालिकेतील काही खेळाडूंची विश्वचषकाच्या संघात निवड देखील होण्याची शक्यता आहे. असे झाले तर कार्तिकला विश्वचषकामध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.
या सामन्यानंतर कार्तिकने हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सोबत संवाद साधला आहे. त्याने कशाप्रकारे त्याच्या खेळामध्ये बदल करत फिनीशरच्या भुमिकेत स्वत:ला कसे घडवले याविषयी माहिती सांगितली आहे. “मला कोणत्याही परिस्थितीत भारताकडून विश्वचषक खेळायचा आहे. हाच ध्यास ठेवत मी आज इथवर आलो आहे. भारतासाठी खेळणे खूप महत्वाचे आहे हे मला माहित असून संघासाठी विशेष कामगिरी करण्याची माझी इच्छा आहे,” असे कार्तिकने म्हटले आहे.
In-flight insightful conversation 👌
Learning from the great @msdhoni 👍
Being an inspiration 👏DO NOT MISS as @hardikpandya7 & @DineshKarthik chat after #TeamIndia's win in Rajkot. 😎 😎 – By @28anand
Full interview 📽️👇 #INDvSA | @Paytmhttps://t.co/R6sPJK68Gy pic.twitter.com/wx1o9dOPNB
— BCCI (@BCCI) June 18, 2022
आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) २०२२च्या हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्सने कार्तिकला संघातून वगळले होते. यानंतर त्याची क्रिकेटची कारकिर्द संपली अशा चर्चा होत होत्या. त्यातच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (आरसीबी) त्याला संधी दिली. या संधीचा फायदा घेत त्याने अनेक सामन्यात विजयी खेळी केली होती. या कामगिरीच्या जोरावरच त्याचे भारतीय संघात तीन वर्षानंतर पुनरागमन झाले. बेंगलोरने दिलेल्या संधीचे त्याने आभार मानले आहे.
“माझ्या मेहनतीत मी कोणतीच कमी नाही ठेवली नाही. नशीबाने आरसीबीकडून खेळण्याची संधी मिळाली हे एक चांगले झाले. त्यावेळी संघाकडून मिळालेल्या जबाबदारीमुळे माझ्यात अनेक बदल झाले. ते आता उपयोगी पडत आहे. भारतीय संघाकडून चमकदार कामगिरी करण्यासाठी मी सदैव तयार आहे,” असे कार्तिकने पुढे म्हटले आहे.
कार्तिक फलंदाजी बरोबर यष्टीरक्षणही उत्तम करतो. त्याची फलंदाजीतील लय अशीच कायम राहिली असता त्याचे विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न पुर्ण होईल, असे झाले तर काही मोठ्या खेळाडूंची जागा जाण्याची शक्यता आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात महत्वपूर्ण खेळी करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळेच संघ १६०च्या पार गेला.
या सामन्यात पुढे आवेश खानने कौतुकास्पद गोलंदाजी केली आहे. त्याने ४ षटकात १८ धावा देत ४ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. त्याला युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार आणि बाकी गोलंदाजांकडून योग्य साथ मिळाली.
रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत आपले आव्हान कायम ठेवले आहे. यातील मालिकेचा निर्णायक सामना रविवारी (१९ जून) बेंगलोर येथे खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचा कसोटी क्रिकेटला रामराम!, अचानकच केली निवृत्तीची घोषणा
‘तेव्हा असं वाटतं, मी म्हातारा झालोय’, मुरली कार्तिकच्या प्रश्नावर असं का म्हणाला डीके?
‘याच’ खेळाडूंना मिळणार इंग्लंड दौऱ्यात संधी, द्रविडचे नाव घेत गांगुलीने दिले संकेत