भारतीय संघ सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळत आहे. डब्ल्यूटीसीच्या या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ भक्कम स्थितीत आहे. अंतिम सामन्यात बारतीय संघाला आपला प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याची कमी जाणवत आहे. असे असले तरी, भारताचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याने बुमराहच्या फिटनेसविषयी एक चांगली बातमी दिली आहे.
डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना झाल्यानंतर भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेची वेळापत्रक अद्याप समोर आले नाही. पण दिनेश कार्तिकच्या मते जसप्रीत बुमराह या मालिकेपूर्वी आपली फिटनेस मिळवेल आणि संघात सामील होईल. डब्ल्यूसीटीच्या अंतिम सामन्यात दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) समालोचकाची भूमिका पार पाडत आहे. त्यावेळी तो म्हणाला, “भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत मैदानात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे.” भारतात यावर्षी आयसीसी वनडे विश्वचषक देखील आयोजित केला जाणार आहे. अशात विश्वचषकात या प्रमुख वेगवागन गोलंदाजाचे पुनरागमन होणार, ही संघासाठी आनंदाजी बाब आहे.
दरम्यान मागच्या वर्षी जुलै महिन्यात जसप्रीत बुमराहला इंग्लंडमध्ये दुखापत झाली होती. त्यानंतर मागच्या वर्षीच सप्टेंबर महिन्यात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून संघात पुनरागमन केले. पण फिटनेसचे कारण देत तो या मालिकेतही खेळू शकला नाही. त्यानंतर आयसीसी टी-20 विश्वचषक 2022मध्येही तो खेळू शकला नाही. जानेवारी 2023मध्ये श्रीलंकेविरुद्धची मालिकाही त्याला खेळता आली नाही. आयसीसीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सला बुमराहकडून खूप अपेक्षा होती. पण त्याने मुंबईच्या चाहत्यांचीही चांगलीच निराशा केली.
मार्च 2023मध्ये बुमराह आपल्या दुखापतीवर शस्त्रक्रियेसाठी न्यूझीलंडला गेला. त्याने शस्त्रक्रियेनंतर सरावाला देखील सुरुवात केली आहे. अशात ऑगस्ट महिन्यात आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याच्या पुनरागमनाची शक्यता वर्तवली जात आहे. बुमराहने जर संघात पुनरागमन केले, तर नक्कीच संघाची ताकद वाढेल. मागच्या मोठ्या काळापासून भारतीय संघाचे वेगवान गोलंदाजी आक्रमण काही अंशी कमजोर दिसत आहे. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्याती संघाला बुमराहची कमी जाणवताना दिसली. (Dinesh Karthik hinted about Jasprit Bumrah’s comeback)
महत्वाच्या बातम्या –
गांगुलींमुळे पाँटिंगचं नुकसान! आयपीएल 2024 मध्ये माजी बीसीसीआय अध्यक्ष घेणार ऑस्ट्रेलियन दिग्गजाची जागा
भारतीय संघ किती धावसंख्या चेस करू शकतो? अजिंक्य रहाणेच्या उत्तरात पाहायला मिळाला आत्मविश्वास