आयपीएलमध्ये सोमवारी (12 ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात 28 वा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर झाला. उत्कृष्ट कामगिरीमुळे आरसीबीने हा सामना 82 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. सामना जिंकून आरसीबीने गुणतालिकेत दोन महत्त्वाचे गुण मिळवले आहेत.
कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकने आरसीबीचा स्टार फलंदाज एबी डिविलियर्स हा केकेआरच्या पराभवासाठी जबाबदार असल्याचे संकेत दिले आहेत. डिविलियर्सच्या खेळीमुळेच सामन्यात फरक पडला असे त्याने सांगितले.
डिविलियर्सने केली उत्तम फलंदाजी
या सामन्यात एबी डिविलियर्सने शानदार फलंदाजी केली. त्याने फक्त 33 चेंडूंत 73 धावा केल्या आहेत. या खेळीदरम्यान त्याने 6 षटकार आणि 5 चौकार ठोकले.
डिविलियर्सला बाद करणे आहे एक आव्हान
दिनेश कार्तिक सामन्यानंतर म्हणाला की, “एबी डिविलियर्स हा जागतिक दर्जाचा खेळाडू आहे आणि शारजाहसारख्या आकाराने लहान असलेल्या मैदानावर त्याला बाद करणे एक आव्हान आहे.”
कामगिरीत करावी लागेल सुधारणा
संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना कार्तिक म्हणाला, “आम्हाला काही क्षेत्रात सुधारणा करण्याची गरज आहे. या सामन्यात आम्ही खराब फलंदाजी केली त्यामुळे फलंदाजीत सुधारणा करण्याचा आम्ही प्रयत्न करू.”
नव्याने करावी लागेल सुरुवात
पुढे बोलताना कार्तिक म्हणाला की, “या सामन्यानंतर आम्हाला 3 दिवसांची विश्रांती मिळणार आहे आणि यानंतर आम्हाला नव्याने सुरुवात करावी लागेल. आयपीएलमध्ये सुरुवातीला बरेच संघ संथ गतीने फलंदाजी करत होते पण आता सर्वच संघ वेगवान धावा करत आहेत. प्रत्येक कर्णधाराच्या कारकिर्दीत असे काही सामने येतात ज्यामध्ये सर्व योजना अपयशी ठरतात. हा सामना त्यापैकी एक होता.”
महत्त्वाच्या बातम्या-
-अफलातून! डिविलियर्सने मारलेला चेंडू थेट मैदानाबाहेरील चालत्या कारवर, पाहा व्हिडिओ
-मिस्टर ३६०ची ‘ही’ करामत पाहून कोणताही गोलंदाज म्हणेल, याला बॉलिंग नकोच
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२०: बेंगलोरने कोलकाताविरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर अशी आहे गुणतालिका
-विरोधी संघ खुश..! आयपीएल २०२०मध्ये बिघडला या ३ स्टार खेळाडूंचा फॉर्म
-‘मिड सीजन ट्रान्सफर’चा फायदा घेत चेन्नई ‘या’ ३ खेळाडूंना घेणार का आपल्या संघात?