सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड असा दुसरा कसोटी सामना मुंबई येथे सुरू आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात ३२५ धावा केल्या. तर, न्यूझीलंड संघ पहिल्या डावात अवघ्या ६२ धावांवर सर्वबाद झाला. सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी केलेल्या प्रदर्शनापुढे न्यूझीलंड संघ स्वस्तात बाद झाला. यामध्ये मोहम्मद सिराजने न्यूझीलंडची पहिली विकेट घेतली आणि त्यानंतर संघाने एकापाठोपाठ एक विकेट्स गमावल्या. मोहम्मद सिराजने या सामन्यात दिलेल्या मोलाच्या योगदानासाठी दिग्गज दिनेश कार्तिकने त्याचे कौतुक केले आहे.
मोहम्म सिराजने न्यूझीलंड संघाचे महत्वाच्या तीन विकेट्स घेतल्या. यामध्ये त्यांचे दोन्ही सलामीवीर टॉम लॅथम आणि विल यंग यांचा समावेश होता. तसेच चौथ्या क्रमांकावरील दिग्गज फलंदाज रॉल टेलरने देखील सिराजच्याच चेंडूवर विकेट गमावली. एकंदरीत सिराजने भारतीय गोलंदाजांसाठी एक चांगली सुरुवात करून दिली होती. यासाठी दिनेश कार्तिकने सिराजचे कौतुक केले. तसेच, ऑस्ट्रेलिया संघाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रासोबत त्याची तुलना देखील केली.
दिनेश कार्तिकने एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना सिराजच्या गोलंदाजीचे कौतुक केले. तो म्हणाला की, “आपण जरी फिरकी गोलंदाजांची चर्चा करत राहिलो, या अप्रतिम गोलंदाजीचा प्रमुख मोहम्मद सिराज होता. ज्याने सुरुवातीला जबरदस्त गोलंदाजी केली. कारण, या मालिकेत न्यूझीलंडचे सलामी फलंदाज मोठी खेळी खेळत भारतीय संघाला अडचणीत टाकत होते. मात्र, मोहम्मद सिराजने ज्याप्रकारची गोलंदाजी करून त्यांना बाद केले, ते अविश्वसनीय होते.”
दिनेश कार्तिकने सिराजची तुलना ऑस्ट्रेलियन संघाचा माजी दिग्गज ग्लेन मॅकग्रा याच्यासोबत केली. “होय, सिराजला गोलंदाजी करताना एक निश्चित एंगल मिळाला आहे. जेथे चेंडू सरळ होतो. पण खरे हे आहे की, तो चेंडूला सीम करत फलंदाजांपासून लांब घेऊन जाण्यासाठी सक्षम आहे. जो नेहमी बॅटच्या कोपऱ्यावर जाऊन लागू शकतो. ही त्याप्रकारची ताकत आहे, जी अनेक गोलंदाजांमध्ये नसते. माझ्या लक्षात आहे की, ग्लने मॅकग्राकडे अशाच प्रकाची शैली होती.” असे सिराज पुढे बोलताना म्हणाला.
दरम्यान, भारतीय संघाने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंड संघावर मोठी आघाडी मिळवली. भारताने त्यांचा दुसरा डाव ७ बाद २७६ धावांवर घोषित केला. न्यूझीलंडला विजय मिळवण्यासाठी शेवटच्या डावात ५४० धावांची आवश्यकता आहे.