भारतीय संघाला या वर्षाच्या शेवटी बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यावर टीम इंडियाची नजर विजयाची हॅटट्रिककडे असणार आहे. भारताने गेल्या वेळी दोनवेळेला कांगारूंना त्यांच्याच धर्तीवर पराभूत करण्यात यश मिळवले होते. त्यामुळे यावेळी तिसऱ्यांदा यजमानांना त्यांच्याच भूमीवर पराभूत करण्यासाठी टीम इंडियाची नजर असेल. मात्र टीम इंडियासाठी हे काम कदाचित सोपे असणार नाही.
खरे तर गेल्या दोन दौऱ्यांमध्ये सहभागी झालेले अनेक भारतीय खेळाडू आता सध्याच्या कसोटी संघाचा भाग नाहीत. अशा स्थितीत टीम इंडिया नव्या खेळाडूंच्या शोधात आहे. दरम्यान आता रोहित शर्मापुढे सर्वात मोठा प्रश्न चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या बदलीचा असेल. या दोन्ही खेळाडूंनी गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
आता अश्या स्थितीत टीम इंडियाचा माजी यष्टीरक्षक क्रिकेटपटू दिनेश कार्तिकला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या बदलीबद्दल विचारण्यात आले. तेव्हा त्याने शुबमन गिल आणि सर्फराज खान यांची नावे घेतली.
तो पुढे बोलताना म्हणाला “शुबमन गिल आणि सरफराज खान या दोन्ही फलंदाजांनी नुकत्याच वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या घरच्या मालिकेत इंग्लंडविरुद्ध खरोखरच चांगली कामगिरी केली आहे. मला वाटते की हे दोघे नक्कीच ऑस्ट्रेलियाला जातील आणि आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील. तर या दाैऱ्यावर आपल्याला कळेल की ते अजिंक्य आणि पुजारा यांची जागा घेऊ शकतात की नाही. पण या दोन्ही खेळांडूची या दाैऱ्यात मोठी भूमिका असणार आहे. तसेच त्यांच्याकडे गुणवत्ता आणि क्षमता आहे.
अजिंक्य रहाणेने अलीकडेच इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटच्या डिव्हिजन 2 मध्ये लीसेस्टरशायरकडून खेळताना ग्लॅमॉर्गनविरुद्ध आपले 40 वे प्रथम श्रेणी शतक झळकावले. पण आता अशी कामगिरी करुनही तो टीम इंडियात पुनरागमन करू शकेल असे वाटत नाही.
बीसीसीआयने दुलीप ट्रॉफीसाठी निवडलेल्या चार संघांमध्ये या दोन दिग्गजांचा समावेश न केल्याने रहाणे आणि पुजारा या दोघांसाठी भारतीय संघाचे दरवाजे पूर्णपणे बंद झाले होते. भारतीय संघ पुजारा-रहाणे यांच्या पलीकडे नव्या खेळाडूंच्या शोधात असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा-
एकेकाळी आयपीएलची मोठी ऑफर नाकारली, आता खाजगी कंपनीत नोकरी करतो हा क्रिकेटर
7 महिन्यांची गर्भवती, बाळ पोटातून लाथा मारतंय…तरीही हार मानली नाही! पॅरा अॅथलीटनं पदक जिंकून रचला इतिहास
इंग्लडच्या विजयाचा दुसऱ्याच संघाला फायदा, WTC गुणतालिकेत मोठा फेरबदल; भारताचं स्थान कितवं