आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याला रविवारी १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज असा असेल. तर दुसऱ्या सामन्यातून कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघ त्यांच्या अभियानाला सुरुवात करणार आहे. त्यांची लढत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) विरुद्ध होणार आहे. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात केकेआरचे प्रदर्शन चांगेल राहिले नव्हते. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात संघ त्यांच्या प्रदर्शनात सुधार करून प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल.
केकेआर संघ फलंदाजीमध्ये दिनेश कार्तिकवर खूप अवलंबून आहे. त्याचे वय ३६ वर्षे झाले आहे. दिनेश परिस्थितीनुसार त्याच्या खेळीत बदल करण्यासाठी ओळखला जातो. तो सध्या केकेआरसोबत पहिल्या सामन्यापूर्वी सराव करत आहे आणि सरावादरम्यान त्याने महेंद्रसिंग धोनीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. केकेआरने त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडिओत दिनेश धोनीचे अनुकरण करताना दिसत आहे. सरावादरम्यान तो धोनीप्रमाणे हेलीकाॅप्टर शाॅट मारताना दिसत आहे. त्याने सराव करताना बऱ्याचदा हा शाॅट मारला आहे. केकेआरने पोस्ट केलेल्या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “डीके वार्मअप करताना हेलीकाॅप्टर शाॅट खेळत आहे. मजबूत कनेक्शन, वा डीके.”
चाहत्यांना दिनेशचा हा हेलिकाॅप्टर शाॅट खूप आवडला असून, केकेआरचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/CT9yMN_Ffig/?utm_source=ig_web_button_share_sheet
दिनेश कार्तिक आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात केकेआरसाठी चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करेल. तसेच केकेआरला प्लेऑफमध्ये पोहचवण्यासाठीही प्रयत्न करताना दिसेल. त्यांने पहिल्या टप्प्यात खेळलेल्या ७ सामन्यांमध्ये १२३ धावा केल्या आहेत. केकेआर संघाचे प्रदर्शनही पहिल्या टप्प्यात काही खास नव्हते. संघाने ७ सामन्यांपैकी केवळ २ सामन्यांत विजय मिळवला आहे आणि गुणतालिकेत संघ सातव्या स्थानावर आहे.
कर्णधारामुळे केकेआरवर झाला परिणाम : आकाश चोप्रा
भारताचे माजी फलंदाज आकाश चोप्रा यांच्या मते आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात इयॉन माॅर्गनच्या नेतृत्वात केकेआरला नुकसान झाले आहे. त्याने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर याबाबत मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला, “माझ्या मते कर्णधाराने केकेआरला थोडे मागे ढकलले. मझ्या लक्षात आहे की, आरसीबीच्या विरोधात वरुण चर्कवर्ती गोलंदाजी करत होता. त्याने दोन षटकांमध्ये दोन विकेट्स मिळवल्या होत्या. मात्र, त्याला गोलंदाजीपासून रोखले गेले आणि मॅक्सवेलला खेळण्याची चांगली संधी मिळाली. जेव्हा वरुण चक्रवर्तीला पुन्हा गोलंदाजीला आणले गेले, पण तेव्हा आरसीबीने त्यांची पकड बनवली होती.”
महत्त्वाच्या बातम्या-
कोहलीशी मतभेदांमुळे कुंबळेंनी सोडले होते प्रशिक्षकपद, पण वादाचं खरं कारण होता ‘तो’
आजच्या लढतीत धोनीच्या किंग्सवर भारी पडणार रोहितची पलटण! ही आकडेवारी पाहून पटेल खात्री
एकही सामना न खेळवता ‘या’ गोलंदाजांला मुंबई इंडियन्सकडून नारळ, २७१ विकेट्स घेणाऱ्या शिलेदारास संधी