पुढील महिन्यात म्हणजेच जून महिन्यात दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात ५ सामन्यांची टी२० मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी रविवारी (२२ मे) भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याला देखील संधी देण्यात आली आहे. यानंतर आता त्याने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
तीन वर्षांनी कार्तिकचे पुनरागमन
दिनेश कार्तिकचे (Dinesh Karthik) भारतीय संघात (Team India) तब्बल तीन वर्षांनी नाव आले आहे. तो भारताकडून अखेरचे २०१९ मधील वनडे विश्वचषकात खेळला होता. त्यानंतर त्याला एकदाही संधी देण्यात आली नाही. पण आयपीएल २०२२ मध्ये त्याने शानदार कामगिरी करत त्याची दखल घेण्यास निवडकर्त्यांना भाग पाडले. त्यामुळे अखेर त्याला भारतीय संघात संधी मिळाली आहे.
कार्तिकची भावूक पोस्ट
९ जूनपासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी (T20 Series against South Africa) भारतीय संघात निवड झाल्यानंतर दिनेश कार्तिकने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘जर तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवला, तर सर्वकाही तुमच्या पारड्यात पडेल. मला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि विश्वासाबद्दल सर्वांना धन्यवाद. मेहनत कायम करत राहिल.’
If you believe yourself, everything will fall into place! ✨
Thank you for all the support and belief…the hard work continues… pic.twitter.com/YlnaH9YHW1— DK (@DineshKarthik) May 22, 2022
कार्तिकने गाजवले आयपीएल २०२२
खरंतर कार्तिककडून आयपीएल २०२१ मध्ये चांगली कामगिरी झाली नव्हती, ज्यानंतक कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याला आयपीएल २०२२ हंगामापूर्वी (IPL 2022) संघातून मुक्त केले. पण त्यानंतर आयपीएल २०२२ लिलावादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला ५ कोटींहून अधिकची बोली लावली आणि संघात सामील करून घेतले. कार्तिकनेही हा विश्वास सार्थ ठरवत शानदार कामगिरी केली.
त्याने या आयपीएल हंगामात १४ सामन्यांत ५७.४० च्या सरासरीने २८७ धावा केल्या. या १४ सामन्यांपैकी ९ सामन्यांत तो नाबाद राहिला. तो या हंगामात बेंगलोरकडून सर्वाधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. तसेच त्याने आयपीएल २०२२ मध्ये बेंगलोरला प्लेऑफमध्ये पोहचवण्यात मोलाचा वाटा देखील उचलला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघ –
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आर बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
लिव्हिंगस्टोनचा षटकार ठरला ऐतिहासिक! १५ वर्षांच्या आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच झाला ‘हा’ पराक्रम
‘आपना टाईम आयेगा’, अर्जुन तेंडुलकरसाठी बहीण साराची भावूक पोस्ट व्हायरल
गोष्ट त्या क्रिकेटरची, ज्याची प्रतिभा अक्षरक्ष: बाळासाहेब ठाकरेंना मैदानावर येण्यास भाग पाडायची