भारतीय क्रिकेट संघाचा दबदबा हा पूर्ण क्रिकेटविश्वामध्ये राहिला आहे. भारतीय संघात अनेक प्रतिभाशाली खेळाडू आहेत. मागील काही काळात तर भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधून अनेक नवीन व प्रभावी चेहरे समोर आले आहेत. अनेक युवा खेळाडूंनी क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात आपला ठसा उमटवला आहे व भारतीय संघात स्थान मिळवले आहे. यातीलच एकच ना म्हणजे यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याचे.
रिषभ पंतने माघील दोन वर्षांत त्याच्या फलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. सर्व क्रिकेट पंडित त्याची प्रशंसा करत आहेत. भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यानेही रिषभ पंतवर वक्तव्य केले आहे. त्याने रिषभचे कौतुक करताना त्याची तुलना वीरेंद्र सेहवाग आणि ऍडम गिलक्रिस्ट शी केली आहे.
दिनेश कार्तिकने म्हटले आहे की, “विरोधी संघावर रिषभ पंतचा प्रभाव असा पडतो जसे जुन्या काळी वीरेंद्र सेहवाग आणि ऍडम गिलक्रिस्ट यांचा असायचा.”
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना कार्तिक म्हणाला, “पंतने संघात लवचिकता आणली आहे आणि व्यवस्थापनाला आवश्यकतेनुसार अतिरिक्त फलंदाज किंवा गोलंदाज आणण्याची संधी दिली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याने विरोधी संघाच्या मनात अशी भीती निर्माण केली आहे, जशी वीरेंद्र सेहवाग आणि ऍडम गिलक्रिस्ट खेळताना विरोधी संघावर असायची.”
पंतचे यष्टीरक्षण वेळेबरोबर सुधारेल
परदेशात त्याची चांगली कामगिरी पाहता, रिषभ पंत हा एक असा फलंदाज आहे जो न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी सामन्यात चांगले प्रदर्शन करू शकतो. वृद्धिमान साहाला जगातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक आहेच. परंतु पंतच्या यष्टीमागील कामगिरीतही वेळोवेळी सुधार होत राही,” असे कार्तिकने पुढे म्हटले.
कार्तिक म्हणाला, “पंतकडे मदतीसाठी वृद्धिमान साहा आहे, जो माझ्या म्हणण्यानुसार जगातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक आहे. साहा पंतला मदत करण्यासाठी नेहमीच तयार असतो. मला माहित आहे की ऑस्ट्रेलियामध्ये असताना पार्थिव पटेल यांनीही त्याला मदत केली होती.”
मागील वर्षी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2-1 ने जिंकली होती. त्यानंतर पंतने पाच डावांमध्ये 68.5 च्या सरासरीने 274 धावा केल्या होत्या. या डाव्या हाताच्या फलंदाजाने आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर दबाव आणला होता. चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात पंतने आपल्या फलंदाजीने भारताला मालिका जिंकून दिली होती. याबरोबरच इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेतही हाच फॉर्म कायम ठेवला होता. त्याने डावात 54 च्या सरासरीने 270 धावा केल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
‘एका संघात सर्व ११ खेळाडू पुजारा किंवा पंतसारखे नको असतात,’ संघ प्रशिक्षकाचे बोल
वय छोटे पण पराक्रम मोठे! २४व्या वर्षापर्यंत ‘या’ भारतीयांनी पार केले षटकारांचे ‘अर्धशतक’





