भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याच्यासाठी यंदाचे वर्ष अविस्मरणीय असे राहिले आहे. आयपीएल २०२२ मधील धडकेबाज प्रदर्शनाच्या जोरावर त्याने भारतीय संघातील आपली जागा परत मिळवली आहे. यानंतर आता १८ वर्षे भारतीय क्रिकेट संघाची सेवा करणाऱ्या कार्तिकला राष्ट्रीय संघाचे नेतृत्त्व करण्याचीही संधी मिळाली आहे, ज्यानंतर तो खूप आनंदित झाला आहे. त्याने ट्वीट करत सर्वांचे आभारही मानले आहेत.
३७ वर्षीय कार्तिकला (Dinesh Karthik) डर्बीशायरविरुद्धच्या सरावाच्या टी२० सामन्यासाठी (Warm Up T20 Match) भारतीय संघाचा कर्णधार नियुक्त केले आहे. आयर्लंड दौऱ्यानंतर भारताच्या संघ व्यवस्थापनाने हार्दिक पंड्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज कार्तिककडे भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे सोपवली गेली आहे. कार्तिकने आपल्या नेतृत्त्वाखाली डर्बीशायरविरुद्ध पहिल्या सराव सामन्यात संघाला विजयही मिळवून दिला आहे.
डर्बीशायरविरुद्ध कर्णधार म्हणून पदार्पण केल्यानंतर कार्तिकने (Captaincy Debut Of Dinesh Karthik) ट्वीट करत लिहिले की, “मी गेल्या बऱ्याच वर्षांपासून भारतीय संघाचा भाग राहिलो आहे. आता पहिल्यांदाच मला भारतीय संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली आहे. जरी मी सराव सामन्यात भारताचा संघनायक म्हणून उतरलो असलो, तरीही माझ्यासाठी हा क्षण खूप खास होता. मला खूप अभिमानास्पद वाटत होते. नेहमी मला पाठिंबा देणारे आणि माझे अभिनंदन करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार. या संघाचा भाग बनल्याचा मला गर्व आहे.”
Have been around for many years but this was the first time I led the team in blue. Even though it was a warm-up game, it felt special and a great honour. Big thanks to all who have always supported and for the wishes.
Proud of being a part of this team 🇮🇳 pic.twitter.com/B7oaxhJ1JS— DK (@DineshKarthik) July 2, 2022
कार्तिकच्या नेतृत्त्वात भारताने जिंकला पहिला सामना
दरम्यान कार्तिकच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने पहिल्या टी२० सराव सामन्यात डर्बीशायरला ७ विकेट्सने पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना डर्बीशायरचा संघ २० षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर १५० धावा करू शकला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने १६.४ षटकातच त्यांचे लक्ष्य पूर्ण केले. भारताकडून दीपक हुड्डाने सर्वोत्तम खेळी केली. ३७ चेंडू खेळताना २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने त्याने ५९ धावांची खेळी केली, जी संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची ठरली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
नशीब असावे तर असे..! बुमराहला नो बॉलमुळे मिळाल्या इंग्लंडच्या २ महत्त्वपूर्ण विकेट्स, पाहा Video
तब्बल १९ वर्षे जुना विक्रम मोडल्याने विडींजच्या दिग्गजाने केले बुमराहचे अभिनंदन, ट्वीट करत लिहिले…
कसोटी इतिहासातील पहिली धाव अन् पहिले शतक चोपले, तरीही फक्त ३ सामन्यांवर संपली कारकिर्द