---Advertisement---

प्ले-ऑफमधील पराभवानंतर RCBच्या दिग्गजाची निवृत्तीची घोषणा, क्रिकेट वर्तुळातून….

Dinesh-Karthik-And-Virat-Kohli
---Advertisement---

आयपीएल 2024 चा हंगाम खूप रोमांचक राहिला आहे. आता या हंगामातील शेवटच्या टप्प्यातील क्वालिफायर 2 आणि फायनल सामना बाकी आहे. 22 मे रोजी राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध राजस्थान राॅयल्स (RR) यांच्यामध्ये एलिमिनेटरचा सामना पाहायला मिळाला. यामध्ये राजस्थाननं आरसीबीचा 4 विकेट्सने पराभव केला.

राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुचा यष्टिरक्षक (Wicket Keeper) दिनेश कार्तिकनं (Dinesh Karthik) आयपीएल मधून निवृत्तीची घोषणा केली. राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या एलिमिनेटर सामन्यांनंतर आरसाबीनं कार्तिकला ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. विराट कोहलीनं कार्तिकला मिठी मारुन मैदानावरुन त्याला शेवटचा निरोप दिला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कार्तिकनं त्याचा अखेरचा आयपीएल सामना खेळला. त्यामध्ये त्यानं 13 चेंडूत 11 धावा केल्या. तर राजस्थानविरुद्ध सामना हरल्यानंतर आरसीबी संघ या हंगामातून बाहेर पडला.

कार्तिक या आयपीएल हंगामाच्या सुरुवातीलाच म्हणाला होता की, हा हंगाम त्याच्या कारकिर्दीसाठी शेवटचा असणार आहे. कार्तिकनं संपूर्ण मैदानावरुन फेरफटका मारत, सर्व प्रेक्षकांचे आभार मानले. त्यावेळी कार्तिक खूप भावूक झाला होता. त्यानं या हंगामात 15 सामन्यांमध्ये 36.22 सरासरीनं 326 धावा ठोकल्या. यादरम्यानं त्याच स्ट्राईक रेट 187.36 राहिलं. आरसीबीनं कार्तिकला फिनिशरची भूमिका दिली होती. परंतु कार्तिक फिनिशरच्या भूमिकेत जास्त प्रभाव पाडू शकला नाही. त्यानं या हंगामात 2 अर्धशतकांसह 27 चौकार आणि 22 षटकार लगावले आहेत.

आयपीएलच्या इतिहासात कार्तिक 257 सामन्यांमध्ये 50 वेळा नाबाद राहिला आहे. त्यानं या कारकिर्दीत 26.32 च्या सरासरीनं 4842 धावा केल्या आहेत. तर 22 अर्धशतकासह त्याची 94 ही सर्वाधिक धावसंख्या राहिली आहे. यादरम्यानं त्यानं 466 चौकारांसह 161 षटकार लगावले आहेत. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत त्यानं 37 स्टंपिंग केल्या आहेत.

आयपीएलच्या इतिहासात कार्तिक दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, गुजरात लॉयन्स, कोलकाता नाईट रायडर्स, या 6 संघांकडून खेळला आहे. 2013ला मुंबई इंडियन्सनं जेव्हा ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळी कार्तिक त्या संघाचा भाग होता.

महत्वाच्या बातम्या-

आरसीबीच्या खराब कामगिरीवर कर्णधार डु प्लेसिसची प्रतिक्रिया, म्हणाला, “जेव्हा आम्ही मेदान…”

आरसीबीचं ट्रॉफीचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं, एलिमिनेटर सामन्यात राजस्थानचा रोमहर्षक विजय

बंगळुरू विरुद्ध राजस्थान सामन्यात फिक्सिंग झालं? दिनेश कार्तिक आऊट होता, मात्र थर्ड अंपायरनं…

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---