अलीकडच्या काळात भारतीय संघामध्ये (Team India) अशा अनेक खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांनी संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारतीय फलंदाज दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर आणि हर्षल पटेल यांचे कौतुक केले आहे. या तीन खेळाडूंनी मागील काही काळात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
सन २०१९ मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळलेल्या दिनेश कार्तिकला भारतीय संघात परतायचे आहे. तो या ३ खेळाडूंबद्दल बोलताना म्हणाला की, “हर्षल पटेल हा एका शोधापेक्षा कमी नाही आणि त्याला गोलंदाजी करताना पाहणे खूप आनंददायक आहे.” हर्षलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेत पुनरागमन केले, ज्यामध्ये भारताने वेस्ट इंडिजचा ३-० असा पराभव केला. हर्षलने या मालिकेतील तीन सामन्यांत पाच विकेट घेतल्या. विशेष म्हणजेच डेथ ओव्हर्समध्ये हर्षलची गोलंदाजी पाहण्यासारखी होती.
कार्तिकने सांगितले की, “हर्षल पटेल हा शोधासारखा समोर आला आहे. अशा परिस्थितीत मला वाटते की, जे खेळाडू येत आहेत, ते संधी मिळताच दोन्ही हातांनी पकडतात, असे खेळाडू पाहणे ही नेहमीच सुखद अनुभूती असते.”
हर्षल पटेलला नुकत्याच झालेल्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने १०.७५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० मध्ये त्याने फक्त दोन षटके टाकली होती. सूर्यकुमारबद्दल बोलताना, दिनेश कार्तिक म्हणाला की, “ज्या खेळाडूंनी ते भारतीय संघात आल्याबरोबर संधीचे सोने केले, ते म्हणजे सूर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यर.”
टी२० मध्ये क्रमवारीत पहिला क्रमांक कायम ठेवण्यासाठी श्रीलंकेचा ३-० ने पराभव केल्यावर कार्तिक म्हणाला, “येथे कोण आहे ज्याला पहिल्या क्रमांकाचा संघ बनायचे नाही? मग ते थोड्या काळासाठी का होईना. आता बाकीचे संघ सामना खेळतील आणि आयपीएलनंतर भारत हा सामना खेळेल, त्यामुळे क्रमवारीत बदल होऊ शकतो. भारतीय संघ सध्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला संघ आहे हे खूप आनंददायी आहे.”
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल सुरू होण्यापूर्वी ब्रॉडकास्टर्स खुश, तब्बल ‘एवढ्या’ लाख लोकांनी पाहिला मेगा लिलाव
टीम इंडियाला धक्का! फॉर्ममध्ये असलेला फलंदाज श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी२०तून बाहेर
हरमनप्रीतच्या झुंजार शतकी खेळीमुळे रोमांचक सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर २ धावांनी विजय