नुकताच भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा पार पडला. या दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी भारतीय संघात फिरकीपटू म्हणून आर अश्विन आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांची निवड करण्यात आली होती. परंतु चहलला या मालिकेत त्याच्या लौकिसास साजेशे प्रदर्शन करता आले नाही. दुसरीकडे चहलचा फिरकी जोडीदार कुलदीप यादव (Kuldeep Yadav) हा तर मागील बऱ्याच काळापासून संघाबाहेर आहे. ‘कुलचा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जोडीला बऱ्याच काळापासून एकत्र खेळण्याची संधी मिळालेली नाही. नुकतेच भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने या जोडीबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.
विश्वचषक २०१९ पर्यंत चहल आणि यादवची जोडी खूप यशस्वी होती. आपल्या फिरकी गोलंदाजीने हे दोन्ही गोलंदाज फलंदाजांची परिक्षा घेत असायचे. त्यांनी मिळून संघाला अनेक अशक्यप्राय विजयही मिळवूनही दिले आहेत. पण २०१९ च्या विश्वचषकानंतर ही जोडी पूर्वीसारखी कामगिरी करताना दिसलेली नाही. तसेच त्यांना एकत्र खेळण्याच्या पुरेशा संधीही मिळालेल्या नाहीत.
व्हिडिओ पाहा- आज फारसे कुणाच्या लक्षात नसलेले टीम इंडियाचे एकेकाळचे पाच T20 Opener
दिनेश कार्तिकने चहल आणि यादवच्या अपयशामागचे (Reason Behind Chahal & Kuldeep Failure) कारण सांगताना म्हटले की, एमएस धोनी (MS Dhoni) च्या काळात चहल आणि यादवची जोडी जास्त यशस्वी होती. कर्णधार नसतानाही धोनी त्या दोघांसाठी क्षेत्ररक्षण लावत असायचा. तो नेहमी यष्टीपाठी उभा राहून त्यांना दिशा-निर्देश देत असे. याचमुळे चहल आणि यादव विराट कोहलीपेक्षा धोनीचे जास्त ऐकत असायचे.
मांजरेकरांनी केली कुलदीपच्या पुनरागमनाची मागणी
कार्तिकव्यतिरिक्त माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनीही यादववर प्रतिक्रिया दिली आहे. यादवचे भारतीय संघात पुनरागमन व्हायला पाहिजे. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये फिरकीपटू अश्विनला संधी देणे अर्थहीन आहे. त्यापेक्षा भारतीय संघाने यादवला आजमावून पाहिले पाहिजे, असे मांजरेकर म्हणाले होते. यादव गेल्या १ वर्षापासून संघाबाहेर आहे.
दक्षिण आफ्रिकेत चहल फ्लॉप
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत संधी मिळूनही चहलला हवी तशी कामगिरी करता आली नाही. त्याने वनडे मालिकेतील तिन्ही सामने खेळले. परंतु तो केवळ २ विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
“वाटत नाही की भुवनेश्वरला भविष्यात भारतीय संघात संधी मिळेल”, माजी क्रिकेटरकडून शंका उपस्थित
आपण फेकलेल्या गुगलीतच फसली राजस्थान रॉयल्सची टीम, नव्या लखनऊ संघाने अशी जिरवली मस्ती
नामकरण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लखनऊ संघाला मोठा धक्का! संघातील प्रमुख सदस्याला कोरोनाची लागण
हेही पाहा-