कोणत्याही क्रिकेटपटूसाठी आपल्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्त्व करणे मोठ्या स्वप्नाप्रमाणे असते. परंतु पदार्पण केल्यानंतर त्याच्यापुढील सर्वात मोठे आव्हान असते ते, संघातील आपली जागा टिकवून ठेवणे. ‘चायनामन’ म्हणून ओळखला जाणारा भारतीय फिरकीपटू कुलदिप यादव (Kuldeep Yadav) याच्यासाठीही सध्या त्याचे भारतीय संघातील स्थान टिकवून ठेवणेही कठीण झाले आहे. गेल्या ५ महिन्यांपासून तो भारतीय संघातून (Indian Cricket Team) बाहेर आहे. तसेच आयपीएललाही तो मुकला आहे. आता हाच कुलदिप संघात पुनरागमन करण्यासाठी कठोर (Training For Comeback) मेहनत घेतो आहे.
बेंगळुरूस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) तो सराव करतो आहे. २६ वर्षीय कुलदिप या वर्षातील जुलै महिन्यापासून क्रिकेटपासून दूर आहे. यानंतर तो आयपीएल २०२१ साठी कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचा भाग होता. परंतु गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो आयपीएल २०२१ च्या युएई टप्प्यातून बाहेर झाला होता. पुढे सप्टेंबर महिन्यात त्याने आपल्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली होती. यानंतर आता तो नियमित सराव करत क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीला लागला आहे.
कुलदिपने आपला सराव करतानाच्या व्हिडिओचा छोटासा क्लिप (Video Of Doing Exercise) इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये तो कसरत करताना दिसतो आहे.
तत्पूर्वी त्याने एनसीएमध्ये फलंदाजी करतानाचे फोटो आणि व्हिडिओदेखील शेअर केले होते. त्याने यावेळी मोहम्मद शमी आणि इतर भारतीय गोलंदाजांच्या चेंडूवर कट शॉट आणि बॅकफूट पंच मारले होते.
आयपीएलच्या मेगा लिलावात सहभागी होणार कुलदिप
आयपीएल २०२१ मध्ये एकही सामना न खेळलेल्या कुलदिपला, पुढील हंगामासाठी त्याच्या कोलकाता नाईट रायडर्स रायडर्स संघाने रिटेन केलेले नाही. परंतु आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावा (IPL 2022 Mega Auction) आधी तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊन पुनरागमनासाठीही सज्ज होऊ शकतो. त्यामुळे कुलदिप लिलावात उतरण्याची दाट शक्यता आहे.
दुसरीकडे कुलदिपचा संघ आणि गतउपविजेता राहिलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने ४ खेळाडूंना संघात कायम केले असून यामध्ये आंद्रे रसल, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर आणि सुनील नारायण या चार खेळाडूंना संघात कायम केले आहे. रसेलला १२ कोटींमध्ये कायम केले असून चक्रवर्ती आणि व्यंकटेशला प्रत्येकी ८ कोटींमध्ये, तसेच नारायणला ६ कोटींमध्ये कायम केले आहे. त्यांच्याकडे लिलावासाठी आता ९० पैकी ४८ कोटी रुपये शिल्लक आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्या ऍशेस विजयानंतर ऑस्ट्रेलियाची कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत मोठी झेप; भारताला मात्र नुकसान
असे ४ वर्षांपूर्वी थाटामाटात पार पडले होते विराट-अनुष्काचे लग्न, पाहा खास फोटो अन् व्हिडिओ