तमिळनाडूने रविवारी (३१ जानेवारी) बडोद्यावर ७ गड्यांनी मात करत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आपल्या नावे केली. संपूर्ण स्पर्धेत अजिंक्य राहत त्यांनी दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. या विजयानंतर तमिळनाडू संघ व कर्णधार दिनेश कार्तिक यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याचवेळी कर्णधार दिनेश कार्तिकने आपल्या संघ सहकार्यांसोबत आनंद साजरा केला. दिनेश कार्तिकने संपूर्ण संघासोबत डान्स करतानाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे.
तमिळनाडूने जिंकली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी
अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात तामिळनाडूने बडोद्याच्या संघाचा एकतर्फी पराभव केला. बडोदा संघाने दिलेले १२१ धावांचे आव्हान तमिळनाडूने दोन षटके राखून तीन गड्यांच्या मोबदल्यात पार केले. युवा फिरकीपटू एम सिद्धार्थ तमिळनाडूच्या विजयाचा शिल्पकार ठरला. सिद्धार्थने आपल्या ४ षटकात ४ महत्त्वपूर्ण बैठक घेत बडोद्याच्या धावसंख्येला लगाम घातला. तमिळनाडूचे हे या स्पर्धेचे दुसरे विजेतेपद आहे.
दिनेश कार्तिकने केला व्हिडिओ
विजेतेपद मिळविल्यानंतर तमिळनाडूचा संघ कमालीचा आनंदी दिसत आहे. कर्णधार दिनेश कार्तिकने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये संपूर्ण संघ एकसारखा डान्स करताना दिसतोय. या व्हिडिओखाली त्याने,’आम्ही एकत्र खेळलो.. आम्ही एकत्र जिंकलो.. आम्ही एकत्र वाढलो’, अशा प्रकारचे कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओला चाहत्यांची पसंती लाभताना दिसतेय. अनेकांनी हा व्हिडिओ लाईक व शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिनेश कार्तिकने संघातील सदस्यांना टॅग देखील केले. ज्यात प्रामुख्याने मुरुगण आश्विन, एन जगदीशन, अरुण कार्तिक व बाबा अपराजित यांचा समावेश आहे.
https://www.instagram.com/p/CKvoAQ8AfC-/?utm_source=ig_web_copy_link
तमिळनाडूचे दुसरे विजेतेपद
तमिळनाडूचे हे दुसरे सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी विजेतेपद आहे. यापूर्वी २००६-२००७ चा हंगामा तमिळनाडूमध्ये आपले पहिले विजेतेपद पटकावण्याची किमया केली होती. विशेष म्हणजे त्यावेळी देखील दिनेश कार्तिक संघाचा कर्णधार होता. मागील वर्षी अंतिम फेरीत कर्नाटककडून पराभूत झाल्याने तमिळनाडू विजेतेपद पटकावून शकला नव्हता.
महत्वाच्या बातम्या:
पहिल्या कसोटीतील विजयाने हुरळून जाऊ नका, पाकिस्तानच्या प्रशिक्षकांनी खेळाडूंना केले सावध
माजी यष्टीरक्षकाने दिल्या भारतीय संघाला कानपिचक्या, म्हणाला
रवी शास्त्री यांनी भारतीय संघात, रमीज राजा यांचे मोठे वक्तव्य