---Advertisement---

‘देशासाठी अजून कमीत कमी एकतरी विश्वचषक खेळायचा आहे,’ अनुभवी यष्टीरक्षकाची इच्छा

---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने विश्वचषक सामन्यात खेळण्याची इच्छा दाखवली आहे. दिनेश कार्तिकला दोन विश्वचषकांपैकी किमान एकामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे. कार्तिकने अखेरचा न्यूझीलंडविरुद्ध 2019 विश्वचषक उपांत्य सामन्यात खेळला होता. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना कार्तिकने अनेक प्रसंगी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील आपली कौशल्य सिद्ध केली आहेत.

भारतीय टी20 संघाबरोबर घालवलेले क्षण आठवत तो म्हणाला की, जोपर्यंत तो तंदुरुस्त असेल तोपर्यंत तो खेळ खेळेल. दिनेश कार्तिक 22 यार्न्स पॉडकास्टमध्ये बोलताना म्हणाला, “जोपर्यंत मी तंदुरुस्त आहे तोपर्यंत मला क्रिकेट खेळायचे आहे. पुढील दोन विश्वचषकांपैकी मला कमीतकमी एका स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करायचे आहे. एक विश्वचषक युएईमध्ये तर दुसरा ऑस्ट्रेलियात होणार आहे. मी मागील विश्वचषकात अयशस्वी झाल्यामुळे मला संघातून वगळण्यात आले होते. तोपर्यंत मी भारतीय टी20 संघासोबत चांगला काळ घालवला होता.”

दिनेश कार्तिकने भारताकडून 94 एकदिवसीय सामने खेळले असून त्याने 1752 धावा केल्या आहेत. तर 32 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 399 धावा केल्या आहेत. दिनेश कार्तिकने समालोचनामध्ये देखील पाऊल ठेवले आहे. जिथे त्याचे चाहत्यांकडून खूप कौतुक होत आहे. कार्तिकने आपल्या खेळाबद्दलच्या माहितीने अनेकांना लोकांना प्रभावित केले आहे.

कार्तिक पुढे म्हणाले की, “सध्याच्या भारतीय संघात बरेच वरच्या फळीतील फलंदाज आहेत, पण त्यांना मधल्या क्रमांकाच्या खेळाडूची गरज आहे. मी अजूनही आयपीएलमध्ये केकेआरकडून मधल्या फळीत खेळत आहे. भारतीय संघाकडे बरेचसे असे फलंदाज आहेत, जे आयपीएलमध्ये आपल्या फ्रंचायझीकडून वरच्या फळीत उरतले आहेत. हार्दिक पंड्या, रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा वगळता कोणी खेळाडू मधल्या क्रमांकावर फलंदाजी करू शकणार नाही. बाकी सर्व फलंदाज आपल्या आयपीएल संघासाठी १-३ क्रमांकावर फलंदाजी करतात.

महत्त्वाच्या बातम्या-

‘फरक पडतोच, जेव्हा खेळाडूंचा हिरोच त्यांचा प्रशिक्षक बनतो,’ श्रीलंकन लीजेंडकडून द्रविडची स्तुती

टीम इंडियाचे नवे युवराज सिंग! माजी अष्टपैलूला ‘या’ तिघांमध्ये दिसते स्वत:ची छबी

इशांत-जसप्रीतचे स्थान धोक्यात, इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत विराटच्या लाडक्या गोलंदाजाची जागा पक्की!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---