भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 लीगमध्ये खेळणार आहे. अशाप्रकारे दिनेश कार्तिक हा दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे. या लीगचा संघ पार्ल रॉयल्सने दिनेश कार्तिकसोबत करार केला आहे. अलीकडेच, आयपीएल 2024 नंतर, दिनेश कार्तिकने क्रिकेटला अलविदा केला होता. मात्र, आता क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की तो दक्षिण आफ्रिकन टी-20 लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व्यतिरिक्त, दिनेश कार्तिक आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि गुजरात लायन्सचा भाग आहे.
26 कसोटी सामन्यांव्यतिरिक्त, दिनेश कार्तिकने 94 एकदिवसीय आणि 60 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या फलंदाजाने कसोटी सामन्यात 25 च्या सरासरीने 1025 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 1 शतकाव्यतिरिक्त 7 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, दिनेश कार्तिकने वनडे फॉरमॅटमध्ये 73.24 च्या स्ट्राइक रेट आणि 30.21 च्या सरासरीने 1752 धावा केल्या. ज्यामध्ये 9 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय दिनेश कार्तिकने भारतासाठी 60 टी-20 सामन्यांमध्ये 142.62 च्या स्ट्राइक रेटने आणि 26.38 च्या सरासरीने 686 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमधील सर्वोत्तम धावसंख्या 55 धावा होती.
दिनेश कार्तिकच्या आयपीएल मधील कामगिरीबाबत बोलायचे झाल्यास त्याने आयपीएल सामन्यांमध्ये 135.36 च्या स्ट्राइक रेटने आणि 26.32 च्या सरासरीने 4842 धावा केल्या. वास्तविक, दिनेश कार्तिकची आयपीएल कारकीर्द बरीच यशस्वी मानली जाते. या लीगमध्ये यष्टीरक्षक फलंदाजाने 22 वेळा पन्नास धावांचा टप्पा पार केला. तर सर्वोत्तम धावसंख्या 86 धावांची होती. मुंबई इंडियन्सने आयपीएल 2013 चे विजेतेपद पटकावले. त्या विजयात दिनेश कार्तिकचे महत्त्वाचे योगदान होते. मात्र, त्यानंतर दिनेश कार्तिक कोणत्याही आयपीएल विजेत्या संघाचा भाग नव्हता. मात्र, आता आयपीएलला अलविदा केल्यानंतर तो दक्षिण आफ्रिकन टी-20 लीगमध्ये दिसणार आहे.
DINESH KARTHIK WILL PLAY FOR PAARL ROYALS IN SA20….!!!!!
Karthik is set to become the first Indian to play in SA20 history. [Espn Cricinfo] pic.twitter.com/cck90qGCrp
— Johns. (@CricCrazyJohns) August 6, 2024
हेही वाचा-
मैदानाऐवजी भारतीय खेळाडू माॅलमध्ये व्यस्त; श्रीलंकेविरुद्धच्या निर्णायक सामन्यापूर्वी टीम इंडियाची शाॅपिंग
सचिनच्या जिवलग मित्राची प्रकृती बिघडली; चालणे फिरणे झाले कठीण, व्हिडिओ आला समोर
बांग्लादेशमधील परिस्थिती नियंत्रणा बाहेर! संतप्त आंदोलकांनी माजी कर्णधाराचे घर जाळले