भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान १८ मार्च रोजी चौथा टी२० सामना खेळला गेलेला. या सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने मालिका बरोबरीत आणली आहे. मात्र, या सामन्यातील पंचांच्या निर्णयांमुळे निर्माण झालेला वाद चांगला वाढलेला दिसून येत आहे. दोन दिवस या वादाची सोशल मीडियावर चर्चा रंगली असताना, भारताच्या दिनेश कार्तिकने एक मजेदार मीम शेअर केले आहे.
अशी होती घटना
अहमदाबाद येथील चौथ्या टी२० सामन्यात भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव याने तुफानी खेळी केली. आपला केवळ दुसरा सामना खेळणाऱ्या सूर्यकुमारने आक्रमक अर्धशतक झळकावले होते. सूर्यकुमारने इंग्लंडचा गोलंदाज सॅम करनच्या गोलंदाजीवर फाईन लेगच्या दिशेने हवेतून फटका खेळला. तिथे उभ्या असलेल्या डेव्हिड मलानने झेल टिपला. मात्र, तो झेल योग्यरित्या झेलला गेला आहे की नाही, याबाबत साशंकता असल्याने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली गेली.
तेव्हा, पंचांनी इंग्लंडच्या बाजूने निर्णय दिला. रिप्लेमध्ये चेंडू स्पष्टपणे जमिनीवर पडल्याचे दिसत असतानाही, पंचांनी असा निर्णय दिल्याने वाद निर्माण झाला. भारतीय कर्णधार विराट कोहली पंचांच्या या निर्णयावर चांगलाच नाराज दिसला. सामन्यानंतरच्या पारितोषिक वितरण समारंभात ही विराटने याबाबत टिप्पणी केली होती.
दिनेश कार्तिकने शेअर केले मीम
पंचांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयामुळे सोशल मीडियावर अनेक जण दुसरे पंच विरेंद्र शर्मा यांच्यावर टीका करत आहेत. भारताचा अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याने देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने एका प्रसिद्ध हिंदी चित्रपटातील छायाचित्र फोटोशॉप करून मीम बनवले आहे. या छायाचित्रात सूर्यकुमार यादव, विराट कोहली व रोहित शर्मा गाडीवर बसलेली दिसत आहेत. कार्तिकने त्या छायाचित्राखाली कॅप्शन देत लिहीले, ‘पंचांचा शोध घ्यायला जाताना सूर्यकुमार, विराट आणि रोहित’
Going to meet the 3rd umpire after today's match
Not much of a meme person, but thought this was funny .@ImRo45 @imVkohli @surya_14kumar
And most importantly, umpiring is probably the toughest Job in cricket .cut them some slack . India won too ❤️ pic.twitter.com/MxYhgcJk2f
— DK (@DineshKarthik) March 18, 2021
चाहत्यांची या मीमला चांगली प्रसिद्धी मिळत आहे. याच सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला देखील पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष : कपिल देवचा उजवा हात म्हणून ओळखले जाणारे मदन लाल






