चीनमधील हॅंगझू येथे सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत गुरुवारी (5 ऑक्टोबर) भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळाले. स्क्वॉश मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या दीपिका पल्लिकल व हरिंदरपाल सिंग या जोडीने मलेशियाच्या जोडीचा 2-0 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. स्क्वॉशमधील भारताचे हे दुसरे सुवर्णपदक ठरले.
हरिंदर व दीपिका या अनुभवी जोडीने या अंतिम सामन्यात विरोधी जोडीला कोणताही संघर्ष करण्याची संधी दिली नाही. त्यांनी सहज विजय संपादन करत भारताच्या खात्यात विसावे सुवर्णपदक टाकले. यापूर्वी भारताच्या पुरुष संघाने स्क्वॉशचे सुवर्णपदक जिंकले होते. दीपिका पल्लीकल ही भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याची पत्नी असून, मागील दहा वर्षांपासून ती भारताचे प्रतिनिधित्व करते.
🥇𝐈𝐧𝐝𝐢𝐚𝐧 𝐒𝐪𝐮𝐚𝐬𝐡 𝐑𝐞𝐢𝐠𝐧𝐬 𝐒𝐮𝐩𝐫𝐞𝐦𝐞!🌟
Our dynamic mixed doubles team of @DipikaPallikal and @sandhu_harinder clinches GOLD, defeating Malaysia by a score of 2-0 in the final at #AsianGames2022!💥🥳
Join us in celebrating this golden achievement and sending… pic.twitter.com/d1GiaRVh4q
— SAI Media (@Media_SAI) October 5, 2023
(Dipika Pallikal And Harindar Pal Singh Won Gold In Sqaush Mixed Doubles In Asian Games)
हेही वाचा-
भारताच्या रणरागिणींची कमाल! तिरंदाजीत मिळवलं Gold, देशाच्या नावावर Asian Gamesमध्ये 82वे पदक
विश्वचषकापूर्वी रोहितचे विधान चर्चेत; म्हणाला, ‘मला आणि खेळाडूंना माहितीये…’