---Advertisement---

शुभमंगल सावधान! तमिळनाडूचा ‘हा’ क्रिकेटपटू प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शकाच्या मुलीबरोबर अडकला लग्नबंधनात

On: सोमवार, जून 28, 2021 7:28 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट आणि चित्रपट सृष्टीचं खूप जुनं नातं आहे. पूर्वीपासूनच भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू आणि चित्रपटमधल्या हिरोईन यांच्या प्रेमाचे किस्से पाहण्यात आणि ऐकण्यात आले आहेत. अगदी मन्सूरअली खान-शर्मिला टागोर ते कर्णधार विराट कोहली-अनुष्का शर्मा पर्यंत अनेक खेळाडू आणि अभिनेत्रींच्या जोड्या पाहायला मिळाल्या आहेत. आता यामध्ये आणखी एका जोडीची भर पडली आहे.

दक्षिण भारतातली प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक शंकरची कन्या ऐश्वर्या हीचे तामिळनाडूचा क्रिकेटर रोहित दामोदरन सोबत लग्न झाले. चेन्नईमध्ये झालेल्या या लग्न सोहळ्याने सगळ्यांना आकर्षित केले होते. चेन्नईच्या मोठ्या रिसोर्टमध्ये पार पडलेल्या लग्न सोहळ्यामध्ये फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील व्यक्तींना आमंत्रण देण्यात आले होते. लग्न सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर लगेचच व्हायरल झाले. सोशल मिडिया द्वारे क्रिकेट रसिकांनी आणि इत्तर लोकांनी या नवदाम्पत्याचे अभिनंदन केले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनीसुद्धा लग्न सोहळ्याला उपस्थिती दाखवली होती.

रोहित दामोदरन क्रिकेटर असून त्याचे वडील एक व्यावसायिक आहेत आणि तमिळनाडू प्रीमिअर लीग मधली मदुराई पँथर्स क्रिकेट संघाचे मालकसुद्धा आहेत. दिग्दर्शक शंकरला ३ मुले आहेत. त्यातली ऐश्वर्या जेष्ठ कन्या आहे. ती पेशाने डॉक्टर आहे. शंकर सध्या ‘इंडियन २’ चित्रपटाच्या कामामध्ये व्यस्त आहेत. यामध्ये दक्षिण अभिनेता कमल हसन मुख्य भूमिकेत असणार आहे.

रोहित दामोदरनची कारकीर्द

२९ वर्षीय रोहित उजव्या हाताचा फलंदाज असून तो ऑफ ब्रेक गोलंदाजीसुद्धा करतो. रोहितने ५१ प्रथम श्रेणीचे, ४८ अ दर्जाचे आणि ३२ टी२० सामने खेळले आहेत. आजवर त्याने २५०६ धावा करत ३८ गडी बाद केले आहे. तसेच त्याने टीएनपीएलमध्ये त्याने मदुराई पँथर्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. रोहितने रवीचंद्रन अश्विन आणि मुरली विजयसारख्या आंतरारष्ट्रीय खेळाडूं सोबत क्रिकेट खेळले आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

राही सरनोबतने पुन्हा उंचावली देशाची मान, नेमबाजी विश्वचषकात जिंकले सुवर्ण

‘दुसरा कर्णधार आयसीसी ट्रॉफी मिळवले याची काय हमी?’, कोहलीच्या बचावात उतरला ‘हा’ क्रिकेटपटू

‘आता माझं डोकं खाण्याची वेळ झाली’, जेव्हा एमएस धोनी करतो पत्नी साक्षीची मस्करी, ट्विट होतंय व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---