फ्रेंच ओपन २०२२चा किताब स्पेनच्या राफेल नदालने आपल्या नावे केला आहे. अंतिम फेरीत त्याने नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा ६-३, ६-३,६-० असा सलग तीन सेटमध्ये पराभव करत १४वे फ्रेंच ओपन जिंकण्याचा पराक्रम केला आहे. ‘लाल मातीचा बादशहा’चे हे कारकिर्दीतील २२वे ग्रॅंड स्लॅम ठरले आहे.
याआधी रुडने उपांत्य फेरीत क्रोएशियाच्या मारिन चिलीचशी दोन हात केले होते. या सामन्यातील तिसरा सेट सुरू असताना सामना काही कारणास्तव १३-१५ मिनिटे थांबवण्यात आला होता. त्यामुळे दोन्ही टेनिसपटू लॉकर रूमकडे गेले. यामागचे कारण स्पष्ट झाले आहे.
झाले असे की, रुड विरुद्ध चिलीच सामना सुरू असताना एक महिला आंदोलक कोर्टवर आली होती. तिने स्वत:ला नेटशी बांधून घेतले. यावेळी तिने घातलेल्या टीशर्टवर ‘आपल्याकडे १०२८ दिवस शिल्लक आहे’ असे लिहीले होते. वेळेतच सुरक्षारक्षकांनी तिला बाहेर काढले. यावेळी रुड ४-१ने पुढे होता.
ही २२ वर्षीय अलीझी नावाची महिला फ्रेंच मधील एका पर्यावरण संस्थेशी निगडीत आहे. तिने लिहीलेल्या टीशर्टवरील संदेशाचे सगळ्यांचे लक्ष वेधले आहेत. या संस्थेने याची जबाबदारी घेतली आहे.
“Aujourd’hui, je suis entrée sur le terrain car je ne peux plus prendre le risque de ne rien faire face à l'urgence climatique".
– Alizée, 22 ans.#derniererenovation #resistancecivile #RolandGarros #RolandGarros2022 pic.twitter.com/5cpfV4Bzdc— Riposte Alimentaire (@riposte_alim) June 3, 2022
हा सामना परत सुरू झाला असता रुडने चिलीचचा ३-६, ६-४, ६-२, ६-२ असा पराभव केला होता. या विजयाने तो नॉर्वेचा पहिलाच टेनिसपटू आहे जो ग्रॅंड स्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचला.
टेनिस विश्वातील या मानांकित स्पर्धेत असा व्यत्यय पहिल्यादांच आला असे नाही. याआधीही दोन वेळा अशा घटना घडल्या आहेत. २००९मध्ये रॉजर फेडरर आणि रॉबिन सोडरलिंग आणि २०१३मध्ये राफेल नदाल आणि डेविड फेरर या अंतिम सामन्यात खंड पडला होता.
तसेच रुडने नदालच्या मालोर्सा,स्पेन अकॅडमीमध्ये सराव केला आहे. अंतिम सामन्यात तो आणि नदाल कारकिर्दीत पहिल्यांदाच आमने-सामने आले होते. फ्रेंच ओपनच्या महिला एकेरीत विजयी ठरलेली इगा स्विटेकने पण नदालच्या स्पेन अकॅडमीमध्ये सराव केला आहे. तिने अंतिम फेरीत कोको गॉफचा ६-१, ६-३ असा पराभव केला आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आरसीबीने नाही दिला चान्स, पण इंग्लंडच्या टी२० लीगमध्ये गाजलाय ‘हा’ खेळाडू
विक्रमवीर ‘राफाʼ..! दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने पटकावले १४वे विक्रमी विजेतेपद
टी२० विश्वचषकात कोणता खेळाडू घेईल धोनीची जागा, शास्त्रींनी घेतले ‘या’ खेळाडूचे नाव