fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

टॉप १०: फेडरर-जोकोविचबद्दल या १० खास गोष्टी माहित आहेत का?

आज(14 जूलै) विम्बल्डन 2019 स्पर्धेतील पुरुष एकेरीचा अंतिम सामना अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविच आणि द्वितीय मानांकित रॉजर फेडरर यांच्यात सेंटर कोर्टवर रंगणार आहे. या दोघांमध्ये होणारा हा एकूण 48 वा सामना असणार आहे.

या दोघांबद्दल ही खास आकडेवारी – 

– जोकोविचने फेडरर विरुद्धच झालेले मागील 4 सामने जिंकले आहेत. तसेच या दोघांमध्ये झालेले मागील 10 सामन्यात 8 वेळा जोकोविचने बाजी मारली आहे.

– आजचा अंतिम सामना हा जोकोविचचा ग्रँडस्लॅममधील 25 वा तर फेडररचा 31 वा अंतिम सामना आहे.

– फेडरर आणि जोकोविचमध्ये आत्तापर्यंत झालेल्या 47 सामन्यांपैकी जोकोविचने 25 आणि फेडररने 22 सामने जिंकले आहे.

– फेडरर हा ग्रँडस्लॅममध्ये 100 विजय मिळवणारा पहिला खेळाडू आहे. त्याने विम्बलडन 2019 मध्ये उपांत्यपूर्व फेरीत केई निशिकोरी विरुद्ध मिळवलेला विजय हा त्याचा ग्रँडस्लॅम स्पर्धेतील 100 वा विजय होता.

– फेडरर सलग 21 व्यांदा विम्बल्डनमध्ये सहभागी झाला आहे. त्याच्या विम्बल्डन 1999 मध्ये पदार्पणाच्या ड्रॉमध्ये असणाऱ्या टेनिसपटूंपैकी सध्या एकेरीमध्ये तो एकमेव सक्रिय टेनिसपटू आहे.

– फेडररचे वय आज 37 वर्षे 340 दिवस एवढे आहे. त्याने आज जर विजेतेपद मिळवले तर तो ओपन एरामध्ये ग्रँडस्लँम विजेतेपद मिळवणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरेल.

– जोकोविचने जर आज विजेतेपद मिळवले तर तो वयाची तिशी पार केल्यानंतर चौथे ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवणारा चौथा पुरुष टेनिसपटू ठरेल. याआधी असे फेडरर, राफेल नदाल आणि रोड लेवर यांनी असा पराक्रम केला आहे.

– जोकोविचने जर आज विजेतेपद मिळवले तर तो तिशी पार केल्यानंतर विम्बलडनचे सलग दुसरे विजेतेपद मिळणारा पहिला टेनिसपटू ठरेल.

– फेडरर हा आज विम्बलडनमधील 12 वा अंतिम सामना खेळणार आहे. त्यामुळे तो विम्बलडनचे 12 अंतिम सामने खेळणारा पहिला आणि एकमेव टेनिसपटू ठरणार आहे.

– फेडरर आणि जोकोविचमध्ये होणारा हा तिसरा विम्बलडनचा अंतिम सामना आहे. याआधी त्यांच्यात 2014 आणि 2015 मध्ये विम्बल्डनचा अंतिम सामना झाला आहे. या दोन्ही अंतिम सामन्यात जोकोविचने विजय मिळवला आहे.

– आज जर जोकोविच जिंकला तर त्याचे हे 5 वे विम्बल्डन विजेतेपद असेल. तर जर आज फेडरर जिंकला तर त्याचे हे 9 वे विम्बल्डन विजेतेपद असेल.

You might also like