---Advertisement---

जोकोविचच्या संयमाचा फुटला बांध, रागाच्या भरात तोडले रॅकेट; व्हिडिओ होतोय व्हायरल

On: शनिवार, जुलै 31, 2021 7:38 PM
---Advertisement---

जागतिक टेनिस क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविच हा मैदानावरील आपल्या संयमी व शिस्तप्रिय स्वभावासाठी ओळखला जातो. मात्र, सध्या टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये त्याचे वेगळेच रूप पाहायला मिळाले. कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यानंतर त्याने केलेल्या एका कृत्यामुळे चाहत्यांची नाराजी ओढावून घेतली आहे. त्याच्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चाहत्यांच्या त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत.

जोकोविचचा झाला पराभव
अव्वल मानांकित जोकोविचला टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरी सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, उपांत्य फेरीत त्याला जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव याने ६-१, ३-६, १-६ असे पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली. त्यानंतर, कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यातही त्याला स्पेनच्या पाब्लो बुस्टाने ६-४, ६-७ (६/८), ६-३ अशी धूळ चारली. त्यामुळे जोकोविच टोकियो येथून एकही पदक घेऊन मायदेशी जाणार नाही.

सामन्यानंतर केली निराशजनक कृती
बुस्टाकडून पराभूत झाल्यानंतर जोकोविच कमालीचा निराश झाला. त्याने भावनेच्या भरात आपले रॅकेट टेनिस कोर्टवर आदळले. हा जोर इतका जास्त होता की ते रॅकेट तुटले. त्याच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर काही चाहत्यांनी शेअर केला. इतरवेळी संयमाने राहणारा जोकोविच असा संतप्त झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

या सामन्यानंतर बोलताना जोकोविच म्हणाला, “बुस्टाला या विजयाचे श्रेय द्यावेच लागेल. मला दुसऱ्या सर्विसवर जास्त लूक मिळाला नाही. माझ्या सर्विस खराब होत होत्या. त्यामुळे माझा खेळ उंचावू शकला नाही. मला सध्या खूप भयानक वाटत आहे. मी या क्षणी सकारात्मक होऊ शकत नाही.”

https://twitter.com/AayushJourno/status/1421437977830457349

जोकोविचकडे होती गोल्डन स्लॅमची संधी
जोकोविचकडे यावर्षी गोल्डन स्लॅम मिळवण्याची सुवर्णसंधी होती. वर्षातील चारही ग्रॅंडस्लॅम व ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावणाऱ्या खेळाडूला गोल्डन स्लॅम मिळाले असे म्हटले जाते. जोकोविचने यावर्षी झालेले पहिले तीनही ग्रँडस्लॅम म्हणजेच ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन व विम्बल्डन त्याने आपल्या नावे केले होते. ऑलिम्पिक सुवर्ण व अमेरिकन ओपन जिंकून त्याला हे गोल्डन स्लॅम पटकावता आले असते.

महत्त्वाच्या बातम्या – 

श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिकेत टीम इंडियाला जाणवली ‘या’ ३ महत्त्वाच्या खेळाडूंची उणीव

तिरंदाजीत पराभूत झाल्यानंतर अतनू दासने मागितली देशाची माफी; म्हणाला, ‘सॉरी इंडिया…’

मुथय्या मुरलीधरन म्हणतो, ‘कुलदीपला टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियात स्थान मिळायला हवे, कारण तो…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---