मेलबर्न। ऑस्ट्रेलियन ओपन २०२१ स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद सार्बियाचा टेनिस स्टार नोवाक जोकोविचने जिंकले आहे. त्याने रशियाच्या डॅनिएल मेदवेदेवला पराभूत करत सलग तिसऱ्यांदा तर एकूण नवव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद मिळवण्याचा कारनामा केला आहे. साल २०१९ पासून जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये अपराजित आहे.
अव्वल मानांकित जोकोविचने १ तास ५३ मिनिटे चालेलेल्या अंतिम सामन्यात चौथ्या मानांकित मेदवेदेवला ७-५, ६-२,६-२ अशा सरळ सेटमध्ये पराभूत करत कारकिर्दीतील एकूण १८ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकले.
विशेष म्हणजे जोकोविचने नवव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात धडक मारली होती आणि त्याने आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियन ओपनचा अंतिम सामना कधीही पराभूत न होण्याचा आपला विक्रम कायम ठेवला. याआधी त्याने २००८, २०११, २०१२,२०१३,२०१५,२०१६,२०१९ आणि २०२० साली ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद मिळवले आहे.
🏆 2008
🏆 2011
🏆 2012
🏆 2013
🏆 2015
🏆 2016
🏆 2019
🏆 2020
🏆 2021@DjokerNole does it again.#AO2021 | #AusOpen pic.twitter.com/fax7I6ceKh— #AusOpen (@AustralianOpen) February 21, 2021
असा झाला सामना –
मेदवेदेवने अंतिम सामन्यातील पहिल्या सेटमध्ये जोकोविचला तगडी लढत दिली होती. जोकोविचने पहिल्या सेटची सुरुवात चांगली केली होती. त्याने मेदवेदेवची पहिलीच सर्विस भेदत आणि आपल्या सर्विसवर २ गेम जिंकत ३-० अशी आघाडी घेतली होती. पण त्यानंतर मेदवेदेवनेही चांगले पुनरागमन केले.
मेदनेदेवने आपल्या दुसऱ्या सर्विसवर गेम जिंकला. त्यानंतर जोकोविचची सर्विस भेदत दुसरा गेम जिंकला आणि त्याच्या तिसऱ्या सर्विसवर तिसरा गेम जिंकत ३-३ अशी बरोबरी साधली. यानंतर दोघांनीही त्यांच्या प्रत्येकी २ सर्विसवर गेम जिंकत ५-५ अशी बरोबरी साधली. मात्र त्यानंतर जोकोविचने पुढील दोनही गेम जिंकत सेट आपल्या नावावर केला.
दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये मात्र जोकोविचने मेदवेदेवला वरचढ होण्याची संधी दिली नाही. जोकोविच आणि मेदवेदेवने दुसऱ्या सेटची सुरुवात एकमेकांची सर्विस भेदत केली होती. त्यानंतर जोकोविचने त्याची सर्विस भेदण्याची संधी मेदवेदेवला दिली नाही. त्याने हा सेट ६-२ असा सहज जिंकला. तिसऱ्या सेटमध्येही पहिले तीनही गेम जिंकत जोकोविचने ३-० अशी झोकात सुरुवात केली. त्यानंतर पुढचा गेम मेदवेदेवने जिंकला. पण पुन्हा जोकोविचने त्याची लय बिघडू न देता हा सेटही ६-२ अशा फरकाने जिंकला.
What. A. Performance.
9-0 in #AusOpen finals 🏆#AO2021 pic.twitter.com/nKkwNVmkAi
— #AusOpen (@AustralianOpen) February 21, 2021
जोकोविच पोहचला नदाल, फेडररच्या जवळ –
पुरुष एकेरीमध्ये सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्याच्या यादीत सध्या रॉजर फेडरर आणि राफेल नदाल प्रत्येकी २० विजेतेपदांसह अव्वल क्रमांकावर आहेत. त्यांच्या पाठोपाठ १८ ग्रँडस्लॅमसह जोकोविच आहे. आता जोकोविच आणि फेडरर व नदालमध्ये केवळ २ ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा फरक आहे.
18 Grand Slams for Djokovic 🏆
This race is tight… 👀 #AusOpen pic.twitter.com/yd7e8bkPeN
— ATP Tour (@atptour) February 21, 2021
जोकोविच ऑस्ट्रेलिन ओपनचे विजेतेपद सर्वाधिकवेळा जिंकणारा टेनिसपटू आहे. त्याच्यापाठोपाठ ६ ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदांसह रॉजर फेडरर आणि रॉय इमर्सन आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियन ओपन: नाओमी ओसाकाने मिळवले चौथे ग्रँडस्लॅम विजेतेपद; फायनलमध्ये ब्रेडीचा पराभव
ऑस्ट्रेलियन ओपनचे कोर्ट्स जोकोविचला जिंकण्यासाठी मदत करतायत? घ्या जाणून कसं ते
ऑस्ट्रेलियन ओपन : दुसऱ्या मानांकित राफेल नदालला पराभवाचा धक्का; त्सित्सिपास सेमीफायनलमध्ये दाखल