भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली सोशल मीडियावर क्वचितच पाहायला मिळतो. पण जेव्हा तो दिसतो तेव्हा नक्कीच त्याच्या पोस्टचे विशेष काहीतरी महत्त्व असत. सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या गांगुलीने आता असा फोटो शेअर केला आहे. ज्याला पाहून आणि त्याचा मथळा (कॅप्शन) वाचून तुम्हाला राष्ट्रपिता महात्मा गांधींची आठवण होईल.
गांगुलीने (Saurav Ganguli) जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो तो भारतीय संघाचा कर्णधार असताना दक्षिण आफ्रिकेत घेण्यात आला होता. या फोटोत तो एका कार्यक्रमामध्ये झाड लावल्यानंतर त्याला पाणी देत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये गांगुलीने आपल्या चाहत्यांना एक प्रश्न विचारला आहे.
त्याने लिहिले आहे, “जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा! या चित्रात दर्शविलेले स्थान ऐतिहासिक आहे आणि एका महान भारतीयांमुळे ते प्रसिद्ध झाले आहे.” त्याने आपल्या चाहत्यांना या फोटोमध्ये दाखवलेली जागा आणि त्या महान भारतीयाचे नाव शोधण्याचे आव्हान दिले होते. ज्यावर त्याच्या चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
त्याच्या फोटोला जवळपास १ लाखांपेक्षा अधिक लोकांनी लाईक करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहत्यांनी सांगितले आहे, की हा फोटो दक्षिण आफ्रिकेतील सेंट पीटरमेरिट्झबर्ग शहरातील आहे. जेथे राष्ट्रपिता महात्मा गांधी (Father of the Nation Mahatma Gandhi) यांना अश्वेतवर्णीय असल्यामुळे रेल्वेच्या पहिल्या श्रेणीच्या डब्यातून जबरदस्तीने खाली उतरविण्यात आले होते. बापू म्हणून ओळखले जाणारे गांधी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत येण्यापुर्वी करण्यापूर्वी लंडनमधून बॅरिस्टर ही पदवी घेऊन वकिली करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला गेले होते.
त्या दिवसांत दक्षिण आफ्रिका ही भारतासारखी ब्रिटीशांच्या ताब्यात होती. तिथे अश्वेतवर्णीयांबरोबर भेदभाव केला जात होता. ट्रेनच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात अश्वेतवर्णीयांना जाण्याची परवानगी नव्हती. एकदा बापू या डब्याचं तिकिट घेऊन प्रवास करत सेंट पीटरमेरिट्झबर्ग शहरात त्यांना जबरदस्तीने खाली उतरवण्यात आल. त्यानंतर बापूंनी दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेशाविरुद्ध चळवळ सुरू केली. ज्यामुळे ते जगभर प्रसिद्ध झाले. तेथे यशस्वी झाल्यानंतरच बापू भारतात परतले आणि देशाच्या स्वातंत्र्य अभियानाची जबाबदारी स्वीकारली होती.
एका चाहत्याने असेही म्हटले आहे, की गांगुलीने अपलोड केलेला फोटो २००३ च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारत आणि नामिबियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी घेण्यात आला होता. त्या सामन्या अगोदर सेंट पीटरमेरिट्झबर्गमध्ये बापूंच्या स्मृतीदिनी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यासाठी भारतीय संघालाही बोलावले होते.
https://www.instagram.com/p/CBDjZKngUGY/?utm_source=ig_web_copy_link
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या मैत्रीला खास उजाळा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान गांगुलीने हे रोप लावलं होत. २००३ विश्वचषकामध्ये गांगुलीच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रदर्शन करत भारत अंतिम सामन्यात पोहचला होता. पण ऑस्ट्रेलियाकडून अंतिम सामन्यात हार पत्करावी लागली होती.
ट्रेंडिंग घडामोडी-
-तुम्ही राहुल द्रविडला युवराज सिंग करु शकत नाही!
-तर इंग्लंडचा कर्णधार जो रुटला रहावे लागणार ७ दिवस आयसोलेशन
-रोहितने ‘हे’ काम केले की तो कसोटी संघात फिट बसेल