---Advertisement---

डाॅक्टरांचा मोठा खुलासा, कार अपघातानंतर रिषभ पंतने पहिल्यांदा विचारला ‘हा’ प्रश्न! म्हणाला…

---Advertisement---

Rishabh Pant car accident: भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या भीषण कार अपघातानंतर मुंबईतील रुग्णालयात दाखल असताना, त्याने डॉक्टरांना विचारलेला पहिला प्रश्न हा होता की, ‘मी पुन्हा खेळू शकेन का?’ या अपघातानंतर पंतवर उपचार करणाऱ्या प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. दिनशॉ पारदीवाला (Dr. Dinshaw Pardiwala) यांनी हा खुलासा केला आहे.

भीषण कार अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर जेव्हा रिषभ पंतला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा त्याचा पहिला प्रश्न होता की, “मी पुन्हा कधी खेळू शकेन का?” हे पंतने ऑर्थोपेडिक सर्जन दिनेशॉ पारदीवाला यांना विचारले होते. दिनेशॉ यांनी ‘टेलिग्राफ’शी बोलताना सांगितले, “त्या अपघातातून पंतला तिथून जाणाऱ्या लोकांनी बाहेर काढले होते. पंत खूप नशीबवान होता की तो बचावला. जेव्हा पंत पहिल्यांदा आला, तेव्हा त्याचा उजवा गुडघा जागेवरून सरकला होता. यासोबतच त्याच्या उजव्या घोट्यालाही दुखापत झाली होती. याशिवाय, त्याला आणखी अनेक दुखापती झाल्या होत्या. त्याची त्वचा खूपच सोलली गेली होती. कारच्या काचेतून बाहेर येताना त्याची त्वचा आणि पाठीचे मांसही फाटले होते.” (Dr. Dinshaw Pardiwala Statement)

डॉक्टरांनी पुढे सांगितले, “अशा प्रकारच्या अपघातात जेव्हा कार उलटते, तेव्हा मृत्यू होण्याची शक्यता खूप जास्त असते. जेव्हा तुमचा गुडघा जागेवरून सरकतो आणि लिगामेंट तुटते, तेव्हा रक्तवाहिन्यांनाही दुखापत होण्याची शक्यता खूप जास्त असते. जर रक्तवाहिन्यांना दुखापत झाली, तर तुम्हाला रक्ताचा पुरवठा पूर्ववत करण्यासाठी 4 ते 6 तासांचा अवधी असतो. सुदैवाने, गुडघा डिस्लोकेट होऊनही पंतच्या रक्तवाहिन्यांना इजा झाली नव्हती.” पंतला जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा त्याचा पहिला प्रश्न होता, “मी कधी पुन्हा खेळू शकेन का?” मात्र, पंतच्या आईने विचारले होते की, तो पुन्हा कधी चालू शकेल का? पंतला या अपघातातून पूर्णपणे बरे होण्यासाठी 635 दिवस लागले. (Dr. Dinshaw Pardiwala Statement)

रिषभ पंत जेव्हा चालायला लागला, तेव्हा तो बेंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गेला आणि त्यानंतर क्रिकेटमध्ये यशस्वी पुनरागमन केले. पंतने आपला जोश आणि जिद्द कायम ठेवली आणि 635 दिवसांनंतर क्रिकेटच्या मैदानावर यशस्वीपणे परतला. त्याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतकं ठोकून अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले. (Rishabh Pant Records)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---