Asia Cup 2025: आशिया कप 2025 संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे की, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या स्पर्धेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. आशिया कपची सुरुवात 10 सप्टेंबरपासून होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी, अशा बातम्या आल्या होत्या की पाकिस्तान संघ भारतात खेळायला येणार नसल्यामुळे भारत आणि यूएईला आशिया कपचे सह-यजमान म्हणून घोषित केले जाऊ शकते. (India Pakistan Asia Cup) आता नवीन अपडेटनुसार, आशिया कपच्या वेळापत्रकाबाबतची ही अनिश्चितता लवकरच संपण्याची शक्यता आहे. (Asia Cup 2025 schedule)
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, आशियाई क्रिकेट कौन्सिल (ACC) जुलैच्या पहिल्या आठवड्यात वेळापत्रक जारी करू शकते. आशिया कप टी20 फॉरमॅटमध्ये खेळला जाणार असून, त्यात एकूण 6 संघ सहभागी होतील. जुलैमध्ये आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या बैठकीनंतर वेळापत्रकावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. स्पर्धेत भाग घेणारे 6 संघ भारत, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि यूएई असतील.
गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे आशिया कपमध्ये भारतीय संघाच्या सहभागाबाबतची स्थिती अजूनही स्पष्ट नाही. गेल्या महिन्यात बीसीसीआयचे (BCCI) सचिव देवजीत सैकिया यांनी भारतीय संघ आशिया कपमध्ये भाग घेणार नाही या अफवा फेटाळून लावल्या होत्या. आता इनसाइड स्पोर्टच्या हवाल्याने बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले आहे की, या संदर्भात बोर्ड सध्या भारत सरकारच्या उत्तराची वाट पाहत आहे.






