रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा विस्फोटक फलंदाज एबी डिविलियर्स हा सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला हा दक्षिण आफ्रिकेचा ३७ वर्षीय फलंदाज एका तरुण खेळाडूच्या स्फुर्तीने फटकेबाजी करताना दिसतोय. मंगळवार रोजी (२७ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल २०२१ चा २२ वा सामना झाला.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पुन्हा डिविलियर्सची ‘३६० डिग्री’ फटकेबाजी पाहायला मिळाली. यावर बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“डिविलियर्सला मी असे बोललेले आवडणार नाही, पण त्याने आयपीएलपुर्वी ५ महिने प्रतिस्पर्धी क्रिकेट खेळले नव्हते. तरीही त्याची धुव्वादार फलंदाजी पाहून तो अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकत नाही, असे अजिबात वाटत नाही. त्याला पाहून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यासारखे भासत नाही. डिविलियर्सला माझा सलाम, आमच्यासाठी (बेंगलोर संघ) पुन्हा पुन्हा तुझे योगदान देत राहा,” असे सामन्यानंतर कोहली म्हणाला.
एबी डिविलियर्सची ‘३६० डिग्री’ फलंदाजी
बेंगलोर विरुद्ध दिल्ली सामन्यात संघ ३ बाद ६० धावा अशा स्थितीत असताना ‘मिस्टर ३६०’ फलंदाजीसाठी मैदानावर उतरला होता. चौकार-षटकारांच्या आतिषबाजीसह त्याने ४२ चेंडूत ७५ धावा चोपल्या. १७८.५७ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करताना त्याने ५ षटकार आणि ३ चौकार मारले. त्याच्या नाबाद ७५ धावांच्या खेळीच्या जोरावर बेंगलोरने चेन्नईच्या खेळापट्टीवर १७१ धावा उभारल्या होत्या.
हे डिविलियर्सचे या हंगामातील दुसरे अर्धशतक ठरले. आयपीएल २०२१ मध्ये आतापर्यंत त्याने ६ सामने खेळताना २०४ धावा चोपल्या आहेत. यात २ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“खरं तर मी खूप निराश आहे…,” पराभवानंतर कर्णधार रिषभ पंतचे भावनिक वक्तव्य
‘तो’ निर्णय घेत रिषभ बचावला अन् कोहलीच्या चेहऱ्याचा रंग उडाला, बघा नक्की काय किस्सा घडला
हेटमायरची ५३ धावांची झुंज व्यर्थ, पराभवानंतर त्याची रिऍक्शन पाहून तुमच्याही डोळ्यात तरळतील अश्रू