क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा अशा मजेशीर घटना घडत असतात, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अशीच मजेशीर घटना ऑल आयर्लंड टी-२० चषक स्पर्धेतील शनिवारी (११ सप्टेंबर) झालेल्या सामन्यात घडली आहे. लाईव्ह सामन्यात घडलेल्या या मजेशीर घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
सहसा सामना सुरू असताना प्रेक्षकांना मैदानाच्या आत येण्याची परवानगी नसते. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात पार पडलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत जार्वो नावाचा व्यक्ती तब्बल ३ वेळेस मैदानात घुसल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. पुढे जार्वोवर कारवाई देखील करण्यात आली होती. परंतु ऑल आयर्लंड टी-२० चषक स्पर्धेत चक्क कुत्र्याने मैदानात येऊन चेंडू घेऊन पळून जाण्याची घटना घडली आहे.
या स्पर्धेत शनिवारी (११ स्पटेंबर) ब्रीडी क्रिकेट क्लब आणि सिव्हील सर्व्हिस नॉर्थ या दोन्ही संघांमध्ये उपांत्यफेरीचा सामना पार पडला. या सामन्यात सिव्हिल सर्व्हिस संघाची फलंदाजी सुरू असताना ९ व्या षटकात फलंदाजाने थर्डमॅनच्या दिशेने कट शॉट खेळला. त्यावेळी क्षेत्ररक्षकाने चेंडू उचलून यष्टिरक्षकाकडे फेकला. यष्टिरक्षकाने तो चेंडू फलंदाजाला बाद करण्यासाठी स्टंपला मारला. परंतु तो चेंडू स्टंपला लागला नाही.
इतक्यात मैदानात कुत्र्याने प्रवेश केला आणि तो चेंडू आपल्या तोंडात धरून मैदानात धावू लागला. त्यावेळी क्षेत्ररक्षक त्या कुत्र्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावत होते. पुढे त्या कुत्र्याचा मालकही त्याला पकडण्याासाठी त्याच्या मागे धावला. अखेर फलंदाजाने त्या कुत्र्याला पकडल्यानंतर चेंडू घेण्यात यश आहे. या मजेशीर घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आयर्लंड महिला क्रिकेटच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.(Dog steals the ball to bring Ireland domestic game to a halt video goes viral on social media)
🐶 Great fielding…by a small furry pitch invader!@ClearSpeaks #AIT20 🏆 pic.twitter.com/Oe1cxUANE5
— Ireland Women’s Cricket (@IrishWomensCric) September 11, 2021
या सामन्यातील पहिल्या डावात ब्रीडी क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ गडी बाद १०५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सिव्हील सर्व्हिस संघाला १२ षटकात ९ गडी बाद अवघ्या ६३ धावा करता आल्या. हा सामना ब्रीडी क्रिकेट क्लबने डकवर्थ लुईस नियमानुसार, ११ धावांनी आपल्या नावावर केला. यासह त्यांनी अंतिम फेरीत देखील प्रवेश केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
झिम्बाब्वे संघाची अविश्वसनीय कामगिरी, अवघ्या १२ चेंडूंमध्ये जिंकला आंतरराष्ट्रीय टी२० सामना
थरारक… ‘या’ संघाचा टी२० सामन्यात तब्बल २०० धावांनी विजय, प्रतिस्पर्धींना अवघ्या २८ धावांवर गुंडाळले
आयपीएलमधून माघार घेतलेल्या मलान अन् बेयरस्टोच्या जागी ‘या’ खेळाडूंना संधी, एकटा MI चा जुना शिलेदार