वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात बुधवारपासून (दि. 12 जुलै) डॉमिनिका येथील विंडसर पार्क मैदानावर पहिल्या कसोटीला सुरुवात झाली. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवल्यानंतर, दुसऱ्या दिवशी देखील पहिल्या सत्रात दमदार सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्मा व या सामन्यातून पदार्पण करत असलेल्या यशस्वी जयस्वाल यांनी भारतीय संघाला शतकी सलामी देत, वैयक्तिक अर्धशतके झळकावली.
या सामन्यात भारतीय संघातर्फे रोहित शर्मा व यशस्वी यांच्या रूपाने नवीन सलामी जोडी पाहायला मिळाली. यजमान संघाला केवळ 150 धावसंख्येत रोखल्यानंतर पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर या दोघांनी दमदार मजल मारलेली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यशस्वी नाबाद 40 तर, रोहित 30 धावांवर नाबाद होता.
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर कोणतीही जोखीम न पत्करता या दोघांनी आपला डाव पुढे नेला. यशस्वीने शानदार चौकार ठोकत आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर रोहितने देखील कारकिर्दीतील पंधरावे कसोटी अर्धशतक पूर्ण केले.
दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्राचा खेळ संपला असताना भारतीय संघाने 145 धावांचा टप्पा पार केला होता. अद्यापही वेस्टइंडीज संघ पाच धावांनी आघाडीवर आहे.
(Dominica Test WIvIND Yashasvi Jaiswal And Rohit Sharma Hits Fifties)
महत्वाच्या बातम्या –
भारतीय संघात असे काही पहिल्यांदाच! शुबमन गिलच्या ‘या’ निर्णयामुळे माजी क्रिकेटपटू हैराण
मैदानावर होती विंडीजची शेवटची जोडी, अचानक नाचायला लागला शुबमन; डान्स कॅमेऱ्यात कैद