---Advertisement---

क्रिकेटमध्ये सर्वाधिक चर्चा झालेली ती शुन्य धावेची खेळी

---Advertisement---

१४ ऑगस्ट १९४८ला जागतिक क्रिकेटमध्ये नेहमी चर्चा होणारी एक घटना घडली होती. या दिवशी सर डाॅन ब्रॅडjन हे आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात ० धावेवर बाद झाले. यामुळे त्यांची कसोटी क्रिकेटमधील सरासरी १०१.३९ वरुन ९९.९४वर घसरली.

या सामन्यात त्यांना १००ची सरासरी राखण्यासाठी केवळ ४ धावा करायच्या होत्या. त्या करुन ते बाद झाले असते तरीही त्यांची सरासरी १०० राहिली असती. किंवा एकही धाव न करता ते नाबाद राहिले असते तरीही त्यांची सरासरी १०१.३९ राहिली असती.

परंतु पहिला सलामीवीर बाद झाल्यावर ते फलंदाजीला आले आणि केवळ दुसऱ्या चेंडूवर त्रिफळाचीत झाले. त्यांना इरिक हाॅलिस या गोलंदाजाने बाद केले. ब्रॅडमन जेमतेम १ मिनीटे तेव्हा मैदानावर फलंदाजीला आले होते. इरिक हाॅलिसने टाकलेला हा चेंडू गुगली होता.

याच मैदानावर पुर्वी खेळताना त्यांनी इंग्लंडविरुद्ध २३२, २४४ आणि ७७ धावा केल्या होत्या. तसेच १९४८मध्येच त्यांनी सरेविरुद्ध खेळताना १४६ आणि १२८ धावांची खेळीही याच मैदानावर केली होती. या सामन्यात फक्त ४ धावा करत त्यांना आपली ही सरासरी १०० राखण्याची गरज होती. पंरतु ज्या खेळाने ब्रॅडमन यांना सर्वकाही दिले तोच खेळ अखेरच्या सामन्यात मात्र त्यांच्यावर चांगलाच रुसला.

या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा पहिला डाव केवळ ५२ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर ब्रॅडमन कर्णधार असलेल्या आस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ३८९ धावा केल्या. याच डावात ब्रॅडमन ० धावेवर बाद झाले.

त्यानंतर तिसऱ्या डावातही इंग्लिश फलंदाजांना विशेष चमक दाखवता आली नाही आणि त्यांचा डाव १८८ धावांतच संपुष्टात आला. यामुळे चौथ्या दिवशीच ऑस्ट्रेलिया १ डाव आण १४९ धावांनी जिंकली.

ब्रॅडमन यांची कारकिर्द- 

कसोटी सामने- ५२, डाव- ८०, धावा- ६९९६, सरासरी- ९९.९४

त्या सामन्यात जर त्यांनी खालली कामगिरी केली असती तर- 

नाबाद राहिले असते तर- सरासरी १०१ पेक्षा जास्त राहिली असती

४ धावा केल्या असत्या आणि बाद झाले असते तर- सरासरी बरोबर १०० झाली असती

फलंदाजीलाच आले नसते तर- सरासरी १०१. ३९ राहिली असती.

ट्रेंडिंग घडामोडी-

-टाॅप ७- कारकिर्दीत १६० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळणारे खेळाडू

-वनडेत विक्रमांचे विक्रम करणारे ५ असे खेळाडू ज्यांचे…

-कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजांवर राज्य करणारे ५ खेळाडू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment