रविवार, 30 ऑक्टोबर रोजी पर्थ स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील रंगतदार सामना चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. पर्थ स्टेडियम वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूस असल्याचे सांगितले जाते. अशात भारतीय फलंदाजांसाठी ही चिंतेची बाब ठरू शकते. परंतु भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांना मात्र वाटत नाही की, वेगवान गोलंदाजी भारतासाठी चिंतेची बाब आहे. त्यांच्या मते भारतीय फलंदाजांना वेगवान चेंडूचा सामना करताना जराही भीती वाटत नाही.
दक्षिण आफ्रिका संघ नेहमीच त्यांच्या वेगवान गोलंदाजांसाठी ओळखला जातो. सध्या त्यांच्या संघात कागिसो रबाडा आणि एन्रिच नॉर्किया असे दिग्गज वेगवान गोलंदाज आहेत. ऑस्ट्रेलियातील परिस्थिती वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असते. गोलंदाजांना ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीवर गती आणि अधिकची झेप मिळत असल्यामुळे फलंदाजांना याठिकाणी खेळताना अडचणी येत असतात. पर्थची खेळपट्टी ऑस्ट्रेलियातील सर्वोधिक वेगवान खेळपट्ट्यांपैकी एक आहे. असे असले तरी, भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड (Vikram Rathod) यांच्या मते भारतीय फलंदाजांना याठिकाणी खेळताना कसलीही अडचण येणार नाही.
माध्यमांशी बोलताना राठोड म्हणाले की, “मला याविषयी जराही चिंता नाहीये. खेळपट्टी चांगली दिसत आहे. पण सामन्याच्या दिवशी खेळपट्टी कसे काम करेल, हे मात्र पाहावे लागेल.” दरम्यान, 16 ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या काही आठवडे आधीच भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला होता. भारताने पर्थमध्येच कॅप लावला असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना त्यांना याचा फायदा नक्की मिळेले. “आम्हाला माहीत होते दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना महत्वाचा असणार आहे. त्यामुळे आम्हा लवकर येऊन पर्थमध्ये आलो आणि सराव केला. याठिकाणच्या परिस्थितीशी आम्ही काही प्रमणात का होईना कल्पना येऊ शकली. नक्कीच याचा फायदा मिळेल,” असे राठोड पुढे बोलताना म्हणाले.
भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतल्याचे दिसत आहे. विराटने पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध अनुक्रमे 82 आणि 62 धावांची नाबाद खेळी केली होती. राठोडांच्या मते विराटने परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल केला आहे. यासाठी फलंदाजी प्रशिक्षकांनी विराटचे कौतुक देखील केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“आम्ही पाकिस्तानला हरवू”; नेदरलँड्सच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केला आत्मविश्वास
केव्हा आणि कुठे पाहाल भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना? खेळपट्टी आणि हवामान अंदाजही घ्या जाणून