इंग्लंडचा संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना यजमान न्यूझीलंडने जिंकून मालिकेची विजयी सुरुवात केली आहे. आता या मालिकेतील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून(29 नोव्हेंबर) हॅमिल्टनला होणार आहे. पण या कसोटी सामन्यापूर्वीच न्यूझीलंडला दोन मोठे धक्के बसले आहेत.
या सामन्यातून न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि अष्टपैलू क्रिकेटपटू कोलिन डी ग्रँडहोम दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत.
ग्रँडहोमने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत चांगली कामगिरी करताना 65 धावांची खेळी केली होती. तसेच गोलंदाजीत दोन्ही डावात मिळून 3 गडी बाद केले होते. पण त्याला स्नायूंच्या दुखापतीचा त्रास होत असल्याने दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडावे लागले आहे.
दुसरीकडे बोल्टला पहिल्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी दुखापत झाली. त्याच्या उजव्या बाजूच्या बरगडीत वेदना झाल्याने ट्रेंट बोल्टला पहिला कसोटी सामना सुरु असताना मैदान सोडावे लागले होते.
2016 पासून बोल्टने न्यूझीलंडच्या केवळ तीन कसोटींमध्ये भाग घेतलेला नाही. त्याने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत शेवटच्या दिवशी केवळ एका षटकात गोलंदाजी केली. या सामन्यात बोल्टला केवळ 1 विकेट घेण्यात यश आले होते. हा सामना न्यूझीलंडने एक डाव आणि 65 धावांनी जिंकला.
या दोन खेळाडूंच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडने अष्टपैलू क्रिकेटपटू डॅरिल मिशेलचा प्रथमच कसोटी संघात समावेश केला आहे, तर फिरकी गोलंदाज टॉड एस्टल आणि लॅाकी फर्ग्युसन यांनाही कसोटी संघात पुन्हा स्थान देण्यात आले आहे.
असा आहे हॅमिल्टन कसोटीसाठी न्यूझीलंडचा संघ –
टॉम लॅथम, जीत रावल, केन विल्यम्सन(कर्णधार), रॉस टेलर, हेन्री निकोल्स, बीजे वॅटलिंग, मिशेल सॅंटनर, टिम साऊथी, नील वॅग्नर, टॉम ब्लंडेल, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, डॅरेल मिशेल, टॉड एस्टल.
अखेर एमएस धोनीने पुनरागमनाबद्दल सोडले मौन; म्हणाला
वाचा- ????https://t.co/IMkm2W4lOc????#म #मराठी #MSDhoni #Cricket #TeamIndia @Mazi_Marathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) November 28, 2019
संघाबरोबर बसने न जाता ३ किलोमीटर पळत हॉटेलवर परतला स्टिव्ह स्मिथ, जाणून घ्या कारण
वाचा????https://t.co/n9bxauTW0R????#म #मराठी #cricket @Mazi_Marathi @MarathiRT #AUSvPAK #SteveSmith— Maha Sports (@Maha_Sports) November 27, 2019






