क्रिकेटचा कोणताही फाॅरमॅट असला, तरी त्यामध्ये हॅट्रिक घेणे ही कोणत्याही गोलंदाजासाठी शानदार रेकाॅर्ड मानला जातो. क्रिकेटच्या अनेक गोलंदाजांनी प्रत्येक फाॅरमॅटमध्ये हॅट्रिक घेऊन आपल्या नावावर रेकाॅर्ड्स रचून ठेवले आहेत. तत्पूर्वी आपण या बातमीद्वारे आपण अशा गोलंदाजाविषयी जाणून घेऊया, ज्याच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकाॅर्ड आहे. त्याने वयाच्या 26व्या वर्षीच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक हॅट्रिक घेण्याचा रेकाॅर्ड केला.
वास्तविक, डग राइटने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक हॅट्रिक घेतल्या आहेत. इंग्लंडकडून खेळणाऱ्या या माजी क्रिकेटपटूने 1932-1957 या कारकिर्दीत 7 वेळा हॅट्रिक घेण्याचा चमत्कार केला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक हॅट्रिक घेण्याच्या त्याच्या रेकाॅर्डची आतापर्यंत कोणी बरोबरी करू शकले नाही. मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्नसारखे आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर राज्य करणारे दिग्गज गोलंदाज देखील या बाबतीत डग राइटच्या जवळपासही कुठे नाहीत.
डग राइट (Doug Wright) प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केंटकडून खेळत होता. 1938 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आपल्या शानदार गोलंदाजीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्याने केली. तो 1951 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला. मात्र, त्यानंतर तो 6 वर्षे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत राहिला. 1957 मध्ये त्याने क्रिकेटला अलविदा केला.
प्रथम श्रेणी कारकिर्दीत सर्वाधिक हॅट्रिक घेणारे टाॅप-5 गोलंदाज-
7 – डग राइट (केंट)
6 – टॉम गोडार्ड (ग्लॉस्टरशायर)
6 – चार्ली पार्कर (ग्लॉस्टरशायर)
5 – स्कोफिल्ड हाय (यॉर्कशायर)
5 – व्हॅलेन्स ज्युप (ससेक्स आणि नॉर्थहॅम्प्टनशायर)
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs BAN; पदार्पण सामन्यातच केली धारदार गोलंदाजी, श्रेय दिले गौतम गंभीरला
“श्रेय फक्त रोहितलाच इतर कोणालाही नाही” गंभीरबद्दल काय म्हणाला ‘हा’ दिग्गज
कोहली, स्मिथ, विल्यमसन तर दूरच… जगातील कोणताच फलंदाज मोडू शकणार नाही, रोहितचे ‘वर्ल्ड रेकाॅर्ड’