दिल्ली प्रीमियर लीगमध्ये सध्या अनेक चुरशीचे सामने खेळले जात आहेत. आज (31ऑगस्ट) शनिवारी झालेल्या सामन्यात दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सच्या संघाने उत्तर दिल्ली सुपरस्टार्सविरुद्ध नवा विक्रम केला. संघाने निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 308 धावा केल्या. या सामन्यात आयुष बदोनीने स्फोटक फलंदाजी केली. या खेळीत त्याने जबरदस्त शतक आणि अनेक षटकार ठोकले.
दिल्ली प्रीमियर लीगचा 23 वा सामना दक्षिण दिल्ली सुपरस्टार्स आणि उत्तर दिल्ली स्ट्रायकर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण दिल्लीच्या सुपरस्टार्सने उत्तर दिल्लीच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. मात्र संघाची सुरुवात चांगली झाली नाही.अवघ्या 13 धावांच्या स्कोअरवर दक्षिण दिल्लीला पहिला धक्का बसला. सलामीवीर सार्थक केवळ 11 धावा करू शकला. मात्र, त्यानंतर कर्णधार आयुष बदोनी आणि सलामीवीर प्रियांश आर्य यांनी उत्तर दिल्लीला एकही संधी दिली नाही.
THE AYUSH BADONI SHOW IN DPL. ????
– 165 (55) with 8 fours and 19 sixes with a Strike Rate of 300. ????pic.twitter.com/C8IDUpNSoM
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 31, 2024
आयुष बदोनी आणि प्रियांश आर्य दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 186 धावांची जबरदस्त भागीदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी शतकी खेळी खेळली. प्रियांश आर्यने 50 चेंडूत 10 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने 120 धावा केल्या. तर दुसरीकडे कर्णधार आयुष बदोनीने 55 चेंडूत 8 चौकार आणि 19 षटकारांच्या मदतीने 165 धावांची शानदार खेळी केली. त्यामुळे दक्षिण दिल्ली संघाने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 308 धावा केल्या. टी20 क्रिकेटच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.
याच सामन्यात प्रियांश आर्यने एकाच षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रमही केला. त्याने मनन भारद्वाजविरुद्ध एकाच षटकात 6 षटकार मारण्याचा पराक्रम केला. एका षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रम अनेक भारतीय फलंदाजांनी केला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ युवराज सिंगने एका षटकात सहा षटकार मारले आहेत. इंग्लंडविरुद्ध त्याने हा मोठा विक्रम केला होता. प्रियांश आर्यने या मोसमातील दुसरे शतक झळकावले.
हेही वाचा-
IPL 2025 पर्यंत टीम इंडियाचे वेळापत्रक समोर; चॅम्पियन्स ट्रॉफीसह या देशांसोबत खेळली जाणार मालिका
भारताला मिळाला नवा ‘युवराज सिंग’,6 चेंडूत सलग 6 षटकार मारून केला कहर
यॉर्कर टाकणाऱ्या सर्वात धोकादायक गोलंदाजांची यादी समोर; दोन भारतीयांचा समावेश






