---Advertisement---

डॉ. पी. ए. इनामदार निमंत्रित फुटबॉल स्पर्धा शनिवारपासून

On: गुरूवार, डिसेंबर 19, 2019 10:42 AM
---Advertisement---

पुणे। आझम स्पोर्ट्स अकादमी यांच्या वतीने डॉ. पी. ए. इनामदार करंडक निमंत्रित फुटबॉल स्पर्धेचे आझम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर २० ते २१ डिसेंबर दरम्यान करण्यात आले असल्याची माहिती आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक गुलझार शेख यांनी दिली.

हे स्पर्धेचे दुसरे वर्ष असून या स्पर्धेत १४ व १७ वर्षांखालील मुलांचे प्रत्येकी ८ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटिन सोसायटीचे सचिव लतीफ इनामदार व आझम एज्युकेशन ट्रस्टचे झुबेर शेख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

स्पर्धा सकाळी ८ वाजल्यापासून लढतींना सुरुवात होईल. स्पर्धा राउंड रॉबिन व नॉकआउट प्रकारात घेण्यात येणार असून विजेत्या संघाला सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार असल्याची माहिती, गुलजार शेख यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---