भारताच्या कसोटी संघाचा प्रभारी कर्णधार जसप्रीत बुमराह याचे फार क्वचित पाहिले गेलेले रूप शनिवारी (०२ जुलै) पाहायला मिळाले. वेगवान गोलंदाज असलेल्या बुमराहने इंग्लंडविरुद्ध ऍजबस्टन येथे सुरू असलेल्या पुनर्निधारीत पाचव्या कसोटी सामन्यात विस्फोटक फलंदाजी केली. त्याने इंग्लंडच्या दिग्गज वेगवान गोलंदाजांमध्ये गणना होणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉड याचा चांगलाच घाम काढला. त्याच्या छोटेखानी पण आक्रमक खेळीला पाहून भारताच्या डगआऊटमधून आलेल्या प्रतिक्रिया लक्षवेधी ठरल्या आहेत. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
त्याचे झाले असे की, भारताच्या डावातील ८४ व्या षटकात बुमराह (Jasprit Bumrah) आणि स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) यांचा आमना सामना झाला. या षटकापूर्वी बुमराह विकेट वाचवून फलंदाजी करत होता. मात्र अचानक त्याने गियर बदलला आणि निर्भीड फटकेबाजी करायला सुरुवात केली. ब्रॉडच्या या षटकाची सुरुवातच बुमराहने चौकारासह केली. सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असलेल्या जॅक क्राउलने त्याचा चौकार अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अपयशी ठरला.
त्यानंतर दबावाखाली आलेल्या ब्रॉडच्या हातून ५ वाईड चेंडू फेकले गेले, ज्याच्या अतिरिक्त ५ धावा भारतीय संघाच्या खात्यात जमा झाल्या. पुढे पुन्हा ब्रॉडने तोच चेंडू नो बॉल फेकला, ज्यावर बुमराहने टॉप एजवर खणखणीत षटकार टोलवला. चांगली सुरुवात मिळाल्याने आत्मविश्वास वाढलेल्या बुमराहने पुढील सलग ३ चेंडूंवर चौकार ठोकले. पाचव्या चेंडूवर पुन्हा एकदा त्याने नेत्रदीपक षटकार ठोकला. मात्र षटकाच्या शेवटच्या चेंडूला तो सीमारेषेबाहेर पाठवण्यात अपयशी ठरला. मात्र त्याने एका षटकात ३५ धावा (35 Runs In An Over) चोपल्या.
https://twitter.com/KuchNahiUkhada/status/1543180646121897986?s=20&t=RlgOdSKoJRak94H640lrcQ
https://twitter.com/KuchNahiUkhada/status/1543180878435987456?s=20&t=RlgOdSKoJRak94H640lrcQ
त्याच्या या बेधुंद फटकेबाजीला अगदी जवळून पाहात असलेल्या, नॉन स्ट्राईकवरील मोहम्मद सिराजच्या (Mohammad Siraj) आनंदापुढे आभाळ ठेंगणे पडले होते. तो बुमराहला अशी फलंदाजी करताना पाहून खूप खुश होत होता. बुमराहने सलग ३ चौकार मारल्यानंतर सिराजने जाऊन त्याला मिठीही मारली. तसेच दुसरीकडे डगआऊटमधून प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid Reaction), फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्यासह विराट कोहली, रविंद्र जडेजा आणि इतर खेळाडूंच्याही प्रतिक्रिया पाहण्यासारख्या होत्या. सर्वजण जोरजारोना टाळ्या पिटत बुमराहचे कौतुक करताना कॅमेरात कैद झाले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बुमराहचा मार खाणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडचा कौतुक करणारा विक्रम, ठरला इंग्लंडचा दुसराच खेळाडू
या शतकानंतर जडेजा खऱ्या अर्थाने झाला ‘सर’! कपिल, धोनी यांच्या यादीत समावेश