बीसीसीआयमध्ये चालेल्या मनमानी कारभारामुळे सर्वोच्च नायालयाने लोढा कमिटी नेमून बीसीसीआयचा कारभार सुधारण्याची मोहिम घेतली आहे.
लोढा समितीने 2017 साली बीसीसीआयची कार्यकारणी बरखास्त करून विनोद रॉय यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकिय समिती नेमली आहे.
या प्रशासकिय समितीने बीसीसीआय, बीसीसीआयचे सदस्य, आजी माजी क्रिकेटपटू तसेच राज्य क्रिकेट संघटना यांच्यामध्ये गेल्या एक वर्षांपासून अनेक सुधारणा घडवल्या आहेत.
यामध्ये लाभाचे पद हा नियमही लोढा समितीचा महत्वाचा निर्णय आहे. यामध्ये कोणतीही व्यक्ती एकवेळी बीसीसीआयमधील दोन पदांवर कार्यरत राहू शकत नाही.
या विषयी बीसीसीआयच्या प्रशासकिय समितीचे प्रमुख विनोद रॉय यांनी राहुल द्रविडबद्दलचा महत्वाचा खुलासा एक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला.
“धनाढ्य आयपीयलमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक माजी क्रिकेटपटूंनी लाभाच्या पदाचे शिकार होऊ नये म्हणून बीसीसीआयच्या पदाचा त्याग करुन आयपीयलमध्ये विविध प्रकारे समाविष्ट झाले. मात्र अंडर-19 संघाच्या प्रशिक्षक पदी राहण्याचा निर्णय सर्वस्वी राहुल द्रवि़डचा आहे.” असे विनोद रॉय यांनी पत्रकारांना सांगितले.
“आम्ही द्रविडला दोन पर्याय दिले होते. पहिला पर्याय म्हणजे अंडर-19 संघाचे प्रशिक्षक पद , बीसीसीआयचा समालोचक किंवा कोणत्याही आयपीयल संघाचा प्रशिक्षक होण्याची मुभा. या पर्यायांपैकी अंडर-19 संघाचे प्रशिक्षकपद द्रविडने स्विकारले. “अशी माहिती विनोद रॉय यांनी द्रविड विषयी बोलताना दिली.
या लाभाच्या पदाच्या वादापासून दूर राहण्यासाठी अनेक माजी क्रिकेटपटूंनी बीसीसीआयच्या पदांचे राजीनामे देऊन अर्थिक फायद्यांची पदे स्विकारली आहेत.
मात्र राहुल द्रविड याला अपवाद आहे. राहुल द्रविडने दिल्ली डेअरडेव्हील्स संघाच्या बक्कळ मानधन असलेल्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा देऊन अंडर-19 भारतीय संघाचे प्रशिक्षकपद स्विकारले होते.
महत्त्वाच्या बातम्या:
–विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी ही आहे आनंदाची बातमी
–Video: रशीद खानच्या भावाची गोलंदाजी पाहिली का?






