भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत विजय मिळवला आणि मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रंगणार आहे. मालिका खिशात घातल्यामुळे तिसऱ्या सामन्यात काही युवा खेळाडूंना अंतिम ११ जणांच्या संघात खेळण्याची संधी दिली जाऊ शकते.
ऋतुराज गायकवाड, आवेश खान यांना संधी दिली जाऊ शकते, तर युझवेंद्र चहल आणि ईशान किशन यांना देखील संघात स्थान दिले जाऊ शकते. तसेच व्यंकटेश अय्यरला या सामन्यात देखील संधी दिली जाऊ शकते. अशातच आम्ही तुमच्यासाठी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या सामन्यातील सर्वोत्तम ११ खेळाडूंचा संघ घेऊन आलो आहोत. चला तर पाहूया कसा असेल या सामन्यासाठीचा ड्रीम ११ संघ.
सामन्याबद्दल अधिक माहिती
सामना – भारत विरुद्ध न्यूझीलंड, तिसरा टी२० सामना
दिनांक – रविवार,२१ नोव्हेंबर,२०२१
वेळ – संध्याकाळी ७:०० वाजता
ठिकाण – ईडन गार्डन्स स्टेडियम,कोलकाता
अशी असू शकते भारत विरुध्द न्यूझीलंड,तिसऱ्या टी २० सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग ११.
भारत – ऋतुराज गायकवाड, रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव/ईशान किशन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टिरक्षक), व्यंकटेश अय्यर, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, आवेश खान, दीपक चाहर, हर्षल पटेल.
न्यूझीलंड – मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), जेम्स नीशम, मिचेल सेंटनर / लॉकी फर्ग्युसन, ॲडम मिल्ने, टीम साऊदी (कर्णधार), ईश सोढी, ट्रेंट बोल्ट.
असा असू शकतो भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या सामन्यासाठी ड्रीम ११ संघ
यष्टिरक्षक – रिषभ पंत
फलंदाज – ऋतुराज गायकवाड, रोहित शर्मा, मार्टिन गप्टील, मार्क चॅपमन
गोलंदाज – टीम साऊदी, युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, हर्षल पटेल
अष्टपैलू खेळाडू – डॅरिल मिशेल, व्यंकटेश अय्यर
कर्णधार – ऋतुराज गायकवाड
उपकर्णधार – मार्टिन गप्टील
महत्त्वाच्या बातम्या –
चिडका शाहीन आफ्रिदी!! आपल्या गोलंदाजीवर षटकार मारल्यानंतर फलंदाजाला फेकून मारला चेंडू, पाहा व्हिडिओ