सध्या भारतात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेचा थरार सुरू आहे. ज्यामध्ये युवा क्रिकेटपटू आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. तर दुसरीकडे वरिष्ठ महिला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा थरार देखील पाहायला मिळाला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या अंतिम सामन्यात रेल्वे आणि कर्नाटक हे दोन्ही महिला संघ आमने सामने होते. या सामन्यात रेल्वे संघाने विजय मिळवत जेतेपदावर आपले नाव कोरले आहे.
या सामन्यात मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रेल्वे संघाने अप्रतिम कामगिरी केली होती. रेल्वे संघाकडून रेणुका सिंगने ४ षटक गोलंदाजी केली आणि कर्नाटक संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ७४ धावांवर कोसळला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रेल्वे संघाकडून सलामीवीर फलंदाज एस मेघनाने ताबडतोड ३६ धावांची खेळी केली आणि रेल्वे संघाला हा सामना ८ गडी राखून जिंकून दिला.
कर्नाटक विरुद्ध पंजाब, रेल्वे विरुद्ध बंगाल यांच्यातील उपांत्य फेरीचे सामने पावसामुळे रद्द करण्यात आले होते. त्यानंतर रेल्वे आणि कर्नाटक दोन्ही संघ त्यांच्या उत्कृष्ट रन रेटमुळे अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते.
कर्नाटक संघाने उत्तर प्रदेश, पाँडिचेरी, छत्तीसगड, सौराष्ट्र आणि बडोदा यांना एलिट गट ई मध्ये पराभूत करून थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. जिथे त्यांनी मध्य प्रदेश संघाचा पराभव केला होता, तर दुसरीकडे, रेल्वे संघाने एलिट गट ब मध्ये चंदीगड, उत्तराखंड, तामिळनाडू, मुंबई आणि ओडिशा या संघांना पराभूत करत अंतिम आठमध्ये थेट प्रवेश मिळवला होता. जिथे त्यांनी ओडिशा संघाचा पराभव केला होता.
https://twitter.com/BCCIWomen/status/1462035108177670153
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, गतविजेत्या रेल्वे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, तर कर्नाटक संघाकडून निक्की प्रसादने सर्वाधिक २१ धावांची खेळी केली. तसेच प्रत्योशा कुमारने १६ धावांचे योगदान दिले. रेल्वे संघातील गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. ज्यामुळे कर्नाटक संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ७४ धावांवर संपुष्टात आला.
या धावांचा पाठलाग करताना रेल्वे संघाकडून एस मेघनाने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली, तर नुझात परवीनने २९ धावांचे योगदान दिले. हा सामना रेल्वे संघाने ८ गडी राखून आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या –
चिडका शाहीन आफ्रिदी!! आपल्या गोलंदाजीवर षटकार मारल्यानंतर फलंदाजाला फेकून मारला चेंडू, पाहा व्हिडिओ






