पाकिस्तान संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये टी२० आणि कसोटी मालिकेचा थरार पाहायला मिळणार आहे. शनिवारी (२० नोव्हेंबर) टी२० मालिकेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तान संघाने अप्रतिम कामगिरी करत ८ गडी राखून विजय मिळवला. यासह मालिकेवर ताबा देखील मिळवला आहे. या सामन्यात शाहीन शाह आफ्रिदीने अप्रतिम गोलंदाजी केली. परंतु, या सामन्यात त्याने असे काही कृत्य केले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धूमाकूळ घालत आहे.
बांगलादेश संघाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात शाहीन शाह आफ्रिदीने पहिल्याच षटकात सेफ हसनला बाद करत माघारी धाडले. त्यानंतर जेव्हा शाहीन आफ्रिदी तिसऱ्या षटकात गोलंदाजीला आला. त्यावेळी दुसऱ्याच चेंडूवर आफिफ हुसेनने अप्रतिम षटकार ठोकला. हा षटकार मारल्यानंतर शाहीन आफ्रिदी भरपूर चिडला होता. त्यानंतर पुढील चेंडू आफिफ हुसेनने डीफेंड केला, जो सरळ शाहीन आफ्रिदीच्या हातात गेला. परंतु, शाहीन आफ्रिदीला आपल्या रागावर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याने तो चेंडू आफिफ हुसेनला फेकून मारला.
चेंडू आफिफ हुसेनला लागताच त्याला भरपूर वेदना होत होत्या. त्यावेळी शाहीन आफ्रिदीने हात वर केला आणि चुकून लागल्याची कबुली दिली. परंतु, शाहीन आफ्रिदीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
https://twitter.com/MeghBulletin/status/1462051275957100547?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1462051275957100547%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-shaheen-shah-afridi-video-viral-on-social-media-after-he-hit-ball-on-afif-hossain-ban-vs-pak-2nd-t20i-watch-3859532.html
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, बांगलादेश संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाकडून नजमुल हुसेन शांतोने सर्वाधिक ४० तर आफिफ हुसेनने २० धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर बांगलादेश संघाला २० षटक अखेर ७ बाद १०८ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाकडून फखर जमानने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली, तर मोहम्मद रिजवानने ३९ धावांचे योगदान देत पाकिस्तान संघाला हा सामना ८ गडी राखून जिंकून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –