इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या ४६ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने येणार आहेत. सध्या दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत १६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. यासह त्यांनी जवळजवळ प्लेऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. तर मुंबई इंडियन्स संघ १० गुणांसह सहाव्या स्थानी आहे. जर मुंबई इंडियन्स संघाला प्लेऑफमध्ये टिकून राहायचे असेल, तर त्यांना या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. तत्पूर्वी आम्ही तुमच्यासाठी, या सामन्यातील सर्वोत्कृष्ट ११ खेळाडूंचा आढावा घेतला आहे. चला तर पाहूया कशी असेल असेल या सामन्यासाठीची ड्रीम इलेव्हन?
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना शनिवारी (२ ऑक्टोबर) भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता शारजहाच्या मैदानावर पार पडणार आहे.
मुंबई इंडियन्स संघाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन :
क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, नाथन कुल्टर नाईल, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर आणि ट्रेंट बोल्ट.
दिल्ली कॅपिटल्स संघाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन:
शिखर धवन, स्टीव्ह स्मिथ, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), शिमरॉन हेटमायर, ललित यादव, आर अश्विन, अक्षर पटेल, कागिसो रबाडा, एन्रिच नॉर्किए आणि आवेश खान.
या सामन्यात हे ११ खेळाडू असू शकतात ड्रीम इलेव्हन संघात
यष्टिरक्षक – क्विंटन डी कॉक
फलंदाज – रोहित शर्मा, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, श्रेयस अय्यर, स्टिव्ह स्मिथ
अष्टपैलू खेळाडू – कायरन पोलार्ड
गोलंदाज – आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, कागिसो रबाडा, जसप्रीत बुमराह
महत्त्वाच्या बातम्या-
बाद की नाबाद? निर्णायक क्षणी तिसऱ्या पंचांचा विवादित निर्णय, केकेआरसोबत अन्याय झाल्याची चर्चा
धोनीने पंचांचाच काढला घाम! मुद्दाम घेतला चुकीचा रिव्ह्यू अन् ड्रेसिंग रूमकडे मारली कूच
VIDEO: केकेआरच्या पदार्पणवीरासाठी शमी ठरला कर्दनकाळ, रॉकेट थ्रोने केले दुर्दैवीरित्या धावबाद






